पाईपलाईन गॅस जोडणीच्या विस्तार करण्यासाठी नवीन पीएनजी जोडणीसाठी अर्ज करावे
ठाणे दि.21(जिमाका) : आखाती देशातील युध्दजन्य परिस्थीती विचारात
घेऊन दि.27 मार्च 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये पीएनजी जोडणीच्या विस्ताराबाबत मार्गदर्शक
सूचना निर्गमीत करण्यात आलेल्या आहेत. तसेच दि.30 मार्च 2026 रोजीच्या शासनपत्रान्वये
व्यावसायीक आस्थापनांना (उदा. हॉटेल, रेस्टॉरंट) यांना व्यावसायीक एलपीजी गॅसच्या पुरवठ्यासाठी
पीएनजी करीता अर्ज करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
तसेच राज्यात पीएनजी जोडणीचा विस्तार
करण्यासाठी जेथे पीएनजी गॅस पाईपलाईन पोहोचलेली आहे व तेथील नागरिकांना/संस्थांना घरगुती/व्यावसायिक
वापराकरिता नवीन पीएनजी जोडणीसाठी अर्ज करावयाचा आहे, अशा नागरिकांनी/संस्थांनी घरगुती/व्यावसायिक
वापराकरिता नवीन पीएनजी जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यातील शहरी भागाकरीता महानगर गॅस लि.
तसेच ग्रामीण भागाकरीता गुजरात गॅस लि. या सिजीडी संस्थांकडे अर्ज करावेत. तथापी काही
कारणास्तव त्यांना सीजीडी संस्थांकडे अर्ज करणे शक्य नसल्यास महानगरपालिका/नगरपालिका
क्षेत्रातील नागरीक संस्थांनी शिधावाटप अधिकारी यांच्याकडे तसेच ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण
भागातील नागरीक / संस्थांनी संबधित तालुक्याचे तहसिलदार/जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे
अर्ज करावेत, असे ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव मस्केपाटील यांनी कळविले आहे.
000000000000
Comments
Post a Comment