औद्दोगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे यशस्वी आयोजन

 



ठाणे दि.20(जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे आणि लाईट हाऊस कॉम्युनिटीइज फाउंडेशन, ठाणे व औद्दोगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.17 एप्रिल 2026  रोजी औद्दोगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, सेक्टर 29, अग्रोली गाव, साबीडी, बेलापूर येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या रोजगार मेळाव्यास एकूण 4 उद्योजक आणि 55 उमेदवारांनी उपस्थिती लावली. विविध क्षेत्रांतील उपलब्ध नोकरीच्या संधींचा लाभ घेत उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यामध्ये एकूण 8 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

या कार्यक्रमाला (CMYKPY समन्वयक) आकाश गोरे,  (कौशल्य समन्वयक) महीदीपसिंग चौहान तसेच (लाईट हाऊस कॉम्युनिटीइज फाउंडेशन, ठाणे) यश पवार व औद्दोगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर प्राचार्य सदाशिव पाटील  उपस्थित होते. मान्यवरांनी उमेदवारांना रोजगाराच्या विविध संधी, कौशल्य विकासाचे महत्त्व आणि करिअर घडवण्यासाठी आवश्यक बाबी याबाबत मार्गदर्शन केले, असे  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे  सहायक आयुक्त संध्या साळुंखे यांनी कळविले आहे.

000000000000

 


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

तहसिलदारांच्या खुर्चीत शिपाई..! ; 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर तातू ठाकरेंचा अनोखा गौरव