महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात अभिवादन

 



 


ठाणे,दि.14(जिमाका) :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त ठाणे येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

         यावेळी  जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ,अतिरिक्त जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, तहसिलदार सचिन चौधर, रेवण लेंभे, उमेश पाटील आदी मान्यवरांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांना, समाजबांधवांना "संविधान उद्देशिका" भेट म्हणून देण्यात आली. 

          


         त्याचबरोबर टाऊन हॉल येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या मान्यवरांनी या प्रदर्शनासही भेट दिली. हे प्रदर्शन पाहण्यासाठी ठाणेकरांनी मोठ्या संख्येने जरूर यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी याप्रसंगी केले.

0000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

तहसिलदारांच्या खुर्चीत शिपाई..! ; 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर तातू ठाकरेंचा अनोखा गौरव