महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



 

ठाणे,दि.14(जिमाका) :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

           


           यावेळी  जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ,अतिरिक्त जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील,  तहसिलदार सचिन चौधर, नायब तहसिलदार मधुकर जाधव आदी मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            त्याचबरोबर टाऊन हॉल येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी ठाणेकरांनी मोठ्या संख्येने जरूर यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी याप्रसंगी केले.

0000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

तहसिलदारांच्या खुर्चीत शिपाई..! ; 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर तातू ठाकरेंचा अनोखा गौरव