मिशन लक्ष्यवेध अंतर्गत ठाणे जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी तात्काळ अर्ज करा

 



 


 

ठाणे,दि.21(जिमाका) :-  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत  राज्यातील क्रीडा विकासाकरिता मिशन लक्ष्यवेध हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. या उपक्रमा अंतर्गत खेळ व खेळाडू, क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडा विषयक पायाभूत सुविधा, क्रीडा स्पर्धेचे आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र, खेळाडूंना प्रोत्साहन व पुरस्कार, खेळाडूंना करीयर मार्गदर्शन खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी-विदेशी संस्थांचा सहभाग हे सर्व घटक विकसित करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने ठाणे जिल्हा स्तरावर टेबल टेनिस, शूटिंग व वेटलिफ्टींग ही क्रीडा निपुणता केंद्र सुरू करण्यात येणार असून गुणवंत खेळाडूंना उच्चस्तरीय प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

            त्या अनुषंगाने ठाणे जिल्हा अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रामध्ये खेळनिहाय प्रत्येकी 20 खेळाडूंची निवड चाचणी प्रक्रिया आयोजित करण्यात येत आहे.

जिल्हास्तर निवड चाचणी निकष :-          

वयोमर्यादा - 21 वर्षाखालील

प्राविण्य - जिल्हास्तर पदकप्राप्त व राज्यस्तर स्पर्धा सहभाग घेतलेले खेळाडू

ई-मेल आयडी - dsothane2020@gmail.com 

गुगल लिंक - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfx0UsQ2MlTrLrSWn_YzuPGFLolY5DRiW24xJJJEHz1LE_uZg/viewform?usp=dialog

सोबत जोडावयाची कागदपत्रे -  जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, गत २ वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, शाळा महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, पालकांचे संमतीपत्र आदि ऑनलाईन अर्जासोबत जोडावे. अर्ज ऑनलाईन तसेच गुगल फॉर्म दोन्ही स्वरूपात भरावा.

निवड चाचणीच्या दिवशी सदर मूळ कागदपत्रे व सत्यप्रती व 3 आय कार्ड साईझ फोटो सोबत घेऊन उपस्थित रहावे, असे आवाहन, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी केले आहे.

000000000

 

 

 


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

तहसिलदारांच्या खुर्चीत शिपाई..! ; 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर तातू ठाकरेंचा अनोखा गौरव