ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील दौरा कार्यक्रमाच्या वारामध्ये प्रशासकीय कारणास्तव बदल

ठाणे,दि.2(जिमाका):- प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात यापूर्वी आठवड्यातील मंगळवार ते शुक्रवार या वारामध्ये नागरीकांच्या सोईकरीता दौरा कार्यक्रमाचे आयोजन करुन नागरीकांची कामे करुन देण्यात येत आहेत. या दौरा कार्यक्रमाच्या वारामध्ये प्रशासकीय कारणास्तव बदल करण्यात आलेले आहेत. तसेच काही दौरा ठिकाणी दौऱ्याचे दिवस वाढविण्यात आलेले आहेत.

यापूर्वी दर मंगळवारी शहापूर येथे दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात येत होता. त्याऐवजी आता दर सोमवारी आयोजित करण्यात येणार आहे.

तसेच भिवंडी येथील दौरा कार्यक्रमामध्ये अतिरिक्त दिवसाची वाढ करण्यात येत असून दर मंगळवारी भिंवडी येथे दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. याची संबंधित वाहन चालक मालक व नागरीकांनी नोंद घ्यावी, असे ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

तहसिलदारांच्या खुर्चीत शिपाई..! ; 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर तातू ठाकरेंचा अनोखा गौरव