निवडणुकीच्या काळात बँकेतून संशयास्पद गैर व्यवहारांना बसणार आळा ----------------------------------------------------------- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बँक प्रतिनिधीची घेतली बैठक
ठाणे दि 24 सप्टेंबर : विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने घोडेबाजाराला लगाम लावण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कठोर पावलं उचलली असून जिल्ह्यातील बँकर्सनी बँक खात्यामधील १ लाखावरील व्यवहारांची तसेच संशयास्पद व्यवहारांची माहिती निवडणूक खर्च कक्षास दैनंदिन देणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले आहे. आज जिल्हास्तरीय बँकर्सची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात २१ सप्टेंबर पासुन विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली असून जिल्ह्यातील सर्व बँकांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, अशी सूचना करून जिल्हाधिकारी नार्वेकर म्हणाले ,बँकेची रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या वाहनांमधून कोणत्याही परिस्थितीत बँके शिवाय अन्य कोणत्याही त्रयस्थ संस्...