![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiX3_KVEXIGoJZV_6BJBr_eQo89nQoe85Ofx4LmXfr46vWJl4-HMUR-0GY_t6qqzEgPGbw12dMc-Ef8qieUAn-Wo6scM08yb-Zv8ZS69KDXZ9IGiBg5OD16Hq0omb78x9N5cbyH4pTz760R/s640/11.jpg)
ठाणे , कल्याण -डोंबिवली , नवी मुंबई पालिकांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा कोरोना सोबतच इतर बाबींवर मनपा यंत्रणांनी लक्ष केंद्रीत करावे पालिकांनी कोरोना विरुद्ध लढताना दक्षता समित्यांचा प्रभावी उपयोग करावा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ------- शासन पालिकांच्या पाठीशी , पण हलगर्जी नको मुंबई दि 24 (जिमाका): शासन पालिकांच्या पाठीशी पण कोरोना रोखण्यात हलगर्जी नको. नागरिकांनी देखील आरोग्याचे सर्व नियम काटेकोरपणे पालन तितकेच गरजेचे आहे असे स्पष्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील पालिकांनी कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून हा लढा अधिक तीव्र करावा असे सांगितले. तसेच पावसाळीआजार , खड्डे , रस्ते कचरा या इतर बाबींवरही लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली त्यात ते बोलत होते. या...