कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन येथे 18 नोव्हेंबर 2025 पासून मीटरप्रमाणे रिक्षा वाहतूक सुरु
ठाणे,दि.13(जिमाका):- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण या कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील कल्याण (पश्चिम) रेल्वे स्टेशन येथे मोटरप्रमाणे रिक्षा वाहतूक (पहिला टप्पा) दि.18 नोव्हेंबर 2025 पासून सुरु करण्यात येत आहे.
याबाबत कल्याण (पश्चिम) या विभागातील ऑटोरिक्षा संघटना यांना कळविण्यात येते की, दि.18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता वरील नमुद ठिकाणी आपल्या ऑटोरिक्षा संघटनाचे पदाधिकारी तसेच संघटनाचे सभासद यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे तसेच जास्तीत जास्त प्रवाशांना मीटरप्रमाणे रिक्षा प्रवास करण्याबाबत प्रोत्साहित करावे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण, आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.
00000

Comments
Post a Comment