राज्यस्तरीय शालेय रग्बी क्रीडा स्पर्धा 2025-26 ( 14 वर्षे मुले व मुली )
ठाणे,दि.19(जिमाका)
:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व जिल्हा
क्रीडा कार्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्ममाने सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये
शासकीय तालुकास्तर/ जिल्हास्तर/ विभागस्तर/ राज्यस्तर शालेय क्रीडा स्पर्धेचे
आयोजन विविध खेळ व वयोगटात करण्यात येते.
राज्यस्तरीय शालेय रग्बी (14
वर्षे मुले व मुली) क्रीडा स्पर्धा सन
2025-26 चे आयोजन करण्याची जबाबदारी ठाणे जिल्ह्याकडे सोपविण्यात आलेली आहे. ही स्पर्धा सेंच्युरी रेयॉन हायस्कूल, बी. के. बिर्ला मार्ग, शहाड, ता.
उल्हासनगर, जि. ठाणे येथे दि.21 व 23
नोव्हेंबर 2025 या कालावधीत करण्यात येत आहे.
या
स्पर्धेत महाराष्ट्रातील 8 विभागातून 16 संघातील सुमारे 304 खेळाडू मुले/मुली, मार्गदर्शक, अधिकारी, पंच सहभागी होत आहेत. तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष
जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या
संकल्पनेतून या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना ट्रॅक
सूट तसेच प्राविण्यप्राप्त खेळाडूंना डिजीटल स्मार्ट वॉच अशी विशेष भेट वितरीत
करण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे
जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी दिली आहे.
00000000000000
Comments
Post a Comment