शेतकऱ्यांसाठी महाविस्तार एआय अॅप शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र

 

 

ठाणे,दि.19(जिमाका) :- शेतकऱ्यांना हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हांनांचा सामना करावा लागतो यावर उपाय म्हणून महाविस्तार AI हे अॅप कृषी विभागामार्फत लाँच केले आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागाने विकसित केलेले हे एक अत्याधुनिक अॅप आहे. कृत्रिम बुद्धिमतेच्या सहाय्याने हे अँप शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून देते. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे अँप शेतकऱ्यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेती पध्दतीचे मार्गदर्शन करते. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते मे 2025 मध्ये खरीप हंगाम बैठकीत महाविस्तार ए आय अॅप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाविस्तार AI अॅपमधील AI आधारित चॅटबॉट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देते. रिअल-टाइम हवामान अंदाज, स्थानिक पातळीवरील हवामान अंदाजामुळे शेतकरी पेरणी, कापणी आणि खतांचा वापर यांचे नियोजन करू शकतात. स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव रिअल-टाइममध्ये दाखवते. कृषी विभागाच्या विविध कृषी योजनांची माहिती, उपलब्ध अनुदान आणि विमा योजनांचे तपशील एकाच ठिकाणी मिळू शकतील. अॅपमध्ये मराठीत व्हिडिओ उपलब्ध आहेत. ज्यात पिकांची लागवड, खतांचा वापर, कापणी आणि जैविक शेती याबाबत तपशीलवार मार्गदर्शन मिळेल. महाविस्तार ए आय अॅप मध्ये पीकनिहाय किड व रोग माहिती तसेच त्याची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय व नियंत्रणाचे उपाय याबाबत माहिती उपलब्ध आहे. तसेच अॅपमधील AI तंत्रज्ञान मध्ये शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करून पिकांवरील रोग आणि किडीचे निदान करुन उपाय मिळवू शकतात.

महाविस्तार AI अॅप शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य बनविण्यासाठी अनेक फायदे घेऊन आले आहे. चुकीच्या पद्धतीने खतांचा किंवा किटकनाशकांचा वापर टाळून शेतकरी उत्पादन खर्च कमी करू शकतात. बाजारभाव माहिती आणि हवामान अंदानामुळे शेतकरी योग्य वेळी पिकांची काढणी, विक्री नियोजन करू शकतात. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. तृणधान्य पिके भात, नाचणी, बाजरी, ज्वारी, कडधान्य पिके-मूग, उडीद, तुर, हरभरा, तेलबिया पिके सोयाबीन, सूर्यफूल, भूईमूग, नगदी पिके-उस, कापूस, भाजीपाला पिके-मिरची, वांगी, भेंडी, कोबी, फुलकोबी, बटाटा, कांदा, टोमटो, फळ पिके, मसाला पिके- आले हळद.

पीकनिहाय प्रमाणभूत पद्धती (SOP) उपलब्ध आहे. त्यामध्ये पूर्व मशागत, बियाण्यांची योग्य निवड. पेरणी. खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, तण नियंत्रण, किडरोग व्यवस्थापन, कापणी व मळणी साठवणूक इत्यादी माहिती उपलब्ध आहे. खत मात्रा गणक मध्ये आपल्याला पिका बाबत प्लॉट चा आकार व माती परीक्षण अहवालानुसार जमिनीतील उपलब्ध मात्रा याबाबत माहिती भरल्यास विविध प्रकारची खते परिमाणा सह वापरासंदर्भात माहिती उपलब्ध होते.

मला प्रश्न विचारा पर्याय वापर वापरून शेतकरी शेतीसंबंधी विविध अडचणी, विविध योजना माहिती पिक पद्धती वाचाबत माहिती विचारु शकतात. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आजच महाविस्तार AI अॅप जास्तीत जास्त शेतकरी यांनी डाउनलोड करा आणि शेतीत डिजिटल क्रांतीचा भाग व्हा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ठाणे रामेश्वर पाचे यांनी केले आहे.

000000000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”