ठाणे जिल्ह्यातील सर्व एम सँड युनिट स्थापन करु इच्छिणाऱ्या व्यक्ती/संस्था यांनी खाजगी जमिनीवर एम सँड उत्पादन करण्यास इच्छुक अर्जदारांनी अर्ज करणे बंधनकारक

 



 

ठाणे,दि.19(जिमाका) :- महसूल व वनविभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडील शासन निर्णय क्र.गोखनी-10/0325/प्र.क्र.80/ख-2, दि.23 मे 2025 अन्वये राज्यातील विविध बांधकामासाठी नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून विकास कामांमध्ये कृत्रिम वाळूचा (M-SAND) वापर करण्याबाबत शासनाने धोरण निश्चित केले आहे. त्यानुषंगाने महसूल व वन विभागाकडील दि.17 जुलै 2025 व दि.27 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार व दि.27 ऑक्टोबर 2025 व दि. 03 नोव्हेंबर 2025 रोजीच्या शासन पत्रान्वये कृत्रिम वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

            कृत्रिम वाळू धोरणाची (M-Sand Policy) प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे जिल्ह्यामध्ये 100 टक्के एम सॅण्ड क्रशर युनिट बसविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून खाजगी जमिनीवर एम सॅण्ड उत्पादन करण्यास इच्छुक अर्जदारांनी वरील नमूद शासन निर्णय व पत्रात नमूद कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज रेतीगट शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे सादर करणे बंधनकारक आहे.

            एम सँड युनिटधारक तीन प्रकारचे असणार आहेत.

अ. मंजूर खाणपट्टा असलेले (Quarry lease), ब. तात्पुरता परवानाधारक (Quarry Permit), क. कोणत्याही प्रकारचा खाणपट्टा नसलेले.

            100 टक्के एम सँड (कृत्रिम वाळू) उत्पादित करु इच्छिणाऱ्या व्यक्ती/संस्थेकडून योजनेच्या सवलती मिळण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करतेवेळी खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

1. आवश्यक कागदपत्रे - 1. मिळकतीचा चालू 7/12 उतारा, फेरफार.

2. वैयक्तिक अर्ज असल्यास अर्जदार यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड.

3. संस्था असल्यास त्याबाबतचे नोंदणी प्रमाणपत्र / संस्थेबाबतची कागदपत्रे.

4. उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र.

5. रु. 500/- इतकी अर्ज फी.

6. युनिटमधून 100% एम सॅण्ड उत्पादित करण्याबाबतचे           रु.100/- च्या बंधपत्रावर हमी.

7. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडील Consent to Establish दाखला.

8. एम सँड उत्पादनासाठी उपलब्ध होणारा दगड कोणत्या खाणपट्टयातून व इतर स्त्रोतांतून (Source) आणण्यात येणार

  आहेत, त्या खाणपट्टयाचा अथवा स्त्रोतांचा तपशील. (खाणपट्टा धारकांचे अथवा तात्पुरता परवानाधारकांचे संमतीपत्र).

9. एम सँड युनिट बसविण्यात येणार आहेत अशा क्षेत्राबाबत संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून त्याबाबतचा वापर   

    अनुज्ञेय आहे अगर कसे? याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र.

            वरील नमूद केल्याप्रमाणे एम सँड धोरणाचा लाभ घेण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील (अंबरनाथ तालुका वगळून) सर्व इच्छुक व्यक्ती/संस्था यांनी वरीलप्रमाणे दिलेल्या सूचनेनुसार परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह या कार्यालयात ही जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या 30 दिवसात सादर करण्याची नोंद घ्यावी. तसेच यापूर्वी संबंधित एम सॅण्ड उत्पादन करणाऱ्या युनिटधारकाने महाखनिज या संगणक प्रणालीवर अर्ज केला असल्यास त्यांनी पुन्हा नव्याने जिल्हाधिकारी, ठाणे यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. एम सॅण्ड (कृत्रिम वाळू) च्या अर्जाबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा खनिकर्म अधिकारी, ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे संपर्क साधावा, असे ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळविले आहे.

            एम सँड युनिट स्थापन करु इच्छिणाऱ्या अंबरनाथ तालुक्यातील   व्यक्ती/संस्था यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर अर्ज करावेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

0000000000


Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”