इतर मागास बहुजन कल्याण, ठाणे जिल्हा कार्यालयासाठी खाजगी इमारत भाड्याने देण्याकरिता इच्छुक इमारत मालकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन
ठाणे,दि.25(जिमाका) - महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंलबजावणी होण्यासाठी दि.9 मार्च, 2017 रोजीच्या अधिसूचनेन्वये इतर मागास बहुजन कल्याण या स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात आली आहे.
या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील कार्यालयासाठी इमारत भाड्याने हवी आहे. तरी ठाणे शहरामध्ये या कार्यालयासाठी ठाणे रेल्वे स्टेशन जवळ अथवा मध्यवर्ती ठिकाणी या परिसरामधील इमारत मालक / बांधकाम विकासक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
इमारतीचा तपशिल :- ही जागा ठाणे परिसरात / ठाणे रेल्वे स्टेशन जवळ अथवा मध्यवर्ती ठिकाणी असणे आवश्यक आहे. या इमारतीची जागा किमान 3000 स्के.फूट व क्षेत्रफळाच्या अटी व शर्तीची पूर्तता करणारी असावी. ही इमारत अधिकृत असावी. व पूर्णत्वाचा दाखला असावा. इमारतीचे भाडे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ठरविल्यानुसार इमारत मालक देण्यास तयार असल्याबाबत संमतीपत्र देणे आवश्यक राहील, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, ठाणे सहायक संचालक समाधान इंगळे यांनी एका प्रसिध्द पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000000000
Comments
Post a Comment