ठाणे जिल्हयात प्रगणना कामासाठी इच्छुक बाहययंत्रणानी मनुष्यबळ पुरविण्याबाबत आवाहन
ठाणे,दि.27(जिमाका) :- केंद्र शासनाकडून राष्ट्रव्यापी लघुसिचंन योजनांची 0.2000 हेक्टर सिंचन क्षमता व 7वी प्रगणना आणि जलसाठयांची 2 री प्रगणना मोठया व मध्यम प्रकल्पांची 1 ली प्रगणना व झऱ्यांची 1 ली प्रगणना या शासन निर्णय, मृद व जलसंधारण विभाग क्र. प्रगण-2023/प्र.क्र.632/जल-4 दि.28/11/2024 करण्यात येत आहे.
या कामासाठी राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी संपन्न झालेल्या बैठकी मध्ये याबाबत प्रगणनेचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्यास या पूर्वीच्या प्रगणनेचा तसेच इतर प्रगणनेचा अनुभव असलेल्या संस्था यांची सदर कामात मदत घेणेबाबत सूचना प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार खालील ठाणे जिल्ह्यातील कामाकरिता अर्ज मागविण्यात येत आहे.
यामध्ये पूर्ण झालेल्या योजनांचा समावेश पुढील प्रमाणे 1. भूपृष्ठाखालील जलसाठ्याच्या वापरासाठी योजनाः साध्या विहिरी, उथळ, मध्यम व खोल कुपनलिका. 2. भूपृष्ठावरील जलसाठ्याच्या वापरासाठी योजनाः ०-2००० हेक्टर सिंचन क्षमतेचे लघु सिंचन योजना, घरण, कालवे, बंधारे, विमोचक, बंद नलिका वितरण प्रणाली इत्यादिमुळे केले जाणारे प्रवाही सिंचन आणि नदी, नाले, बंधारे, जलाशय इत्यादिवरील उपसा सिंचन योजना. 3. नागरी आणि ग्रामीण भागातील जलसाठे (वॉटर बॉडीज) व 2000 हेक्टर वरील सिंचन क्षमतेचे मोठे व मध्यम प्रकल्प आणि उपसा सिंचन योजना इत्यादी. 4. कृषि व मृदसंधारण विभागाकडील सिमेंट बंधारे, शेततळे, सिंचन विहीरी इत्यादी. 5. भूजल सर्वेक्षण यंत्रणे संबंधित कुपनलिका इत्यादी कामे.
सदरील प्रगणना कामासाठी इच्छुक बाह्ययंत्रणानी या कार्यालयास दि. 03-12-2025 रोजी दुपारी 12:00 वा. पर्यंत आपले प्रस्ताव सर्व कागदपत्रासोबत (प्रमाणपत्रासोबत) सादर करावे. सदरील ठाणे जिल्ह्यातील प्रगणना कामासाठी इतर प्रगणना कामाचा पूर्वानुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. व इतर जिल्ह्यात नियुक्ती आदेश प्राप्त झालेल्या संस्थांना प्राधान्य देण्यात येईल. अधिक माहिती साठी, श्री. संजय कचरे (सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी) दूरध्वनी-९१६७८७२७८९ वर संपर्क साधा किंवा सदर कामाबाबतची सर्व माहिती या कार्यालयाच्या नोटीस बोर्ड वर बघायला मिळेल. असे आवाहन फरीद खान, जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, कळवा ठाणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000000000
Comments
Post a Comment