ठाणे जिल्हयात अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवावा.
ठाणे,दि.27(जिमाका) :- ठाणे जिल्हयात अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्यासाठी जिल्हयातील सर्व जिल्हा नियोजन तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी, जिल्हा अल्पसंख्याक कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने राज्यात संविधान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत 'भारतीय संविधान जागृती प्रश्नमंजुषा 2025 हा उपक्रम राबवण्यात येत आहे. संविधानाबाबतची जागरुकता वाढविणे, विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची रुजवण करणे व नागरिका कर्तव्याविषयी सजगता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या बाबत अल्पसंख्याक विकास विभागाने दि. 19 नोव्हेंबर रोजीचे पत्राने कळविले आहे.त्याअनुषंगाने ठाणे जिल्हयातील शिक्षणाधिकारी प्राथमिक / माध्यमिक यांनी मोठया संख्येने सहभाग नोंदवावा.
युवा करिअर संस्थेद्वारे खालीलप्रमाणे स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
1. मराठी /हिंदी /इंग्रजी भाषांमध्ये प्रश्नमंजुषा 2.ऑनलाइन पद्धतीने जिल्हा व राज्यस्तरापर्यंत स्पर्धा 3. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र 4. विजेत्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, पुरस्कार व विशेष मान्यता.
यासाठी नोंदणी प्रक्रिया पुढील प्रमाणे 1. शाळा/महाविद्यालयाने अंतर्गत निवड प्रक्रिया राबवावी. 2. किमान 10 विद्याथ्यांची नोंदणी बंधनकारक. 3. प्रत्ति विद्यार्थी नांदणी शुल्क रु99/- 4.नाव नोंदणीची लिंकः www.yuvacareer.com भारतीय संविधान जागरूकता प्रश्नमंजुषा 2025 नोंदणी फॉर्म भरावा.
तरी ठाणे जिल्हयातील शिक्षणाधिकारी यांनी प्राथमिक / माध्यामिक आपल्या कार्यक्षेत्रातील संस्थेतील विद्यार्थी विशेषत अल्पसंख्याक योजनांचा लाभ घेणारे विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा. यासाठी तात्काळ सूचना द्याव्यात. प्रत्येक अल्पसंख्यांक दर्जा असणा-या शाळा/ महाविद्यालय/ संस्था/ मदरसा यांनी किमान दहा विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करावा. तसेच. सहभागी विद्यार्थ्यांच्या संख्येसह अहवाल जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांना pothanet@gmail.comया ईमेल आयडीवर सादर करावा. असे आवाहन जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी ठाणे वैभव कुलकणी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Comments
Post a Comment