सन 2026 मध्ये EL-Nino चा संभाव्य धोका लक्षात घेऊन विविध मृद व जलसंधारण विषयक उपाययोजनां राबविण्यातबाबत ठाणे जिल्हयात जनजागृती करणेसाठी शिवार फेरींचे आयोजन
ठाणे दि.२१(जिमाका) :- भारतीय हवामान विभागा नुसार २०२६ हे एल निनों चे वर्ष आहे. एल निनोमुळे भारतीय मान्सूनची वाटचाल मंदावते, ज्यामुळे
पिकांवर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि अन्नधान्य उत्पादनात घट होण्याची शक्यता असते. एल
निनो स्थिती असताना पावसाचे आगमन उशिरा होणे, पावसात खंड पडणे व एकूण पर्जन्यमान कमी
राहणे असे परिणाम दिसू शकतात. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी उशिरा होण्याची क्रिया
पुन्हा पेरणी (पुनर्लागवड) करण्याची वेळ येऊ शकते. मातीतील ओलावा लवकर कमी झाल्यामुळे
पिकावर ताण येऊन पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. फुलोरा व दाणे भरण्याच्या
अवस्थेत पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता असते. सभांव्य
दुष्काळी परिस्थितीमुळे जलस्रोतामध्ये पाणीसाठा कमी झाल्यास सिंचनाची उपलब्धता घटते
व भूजल पातळी कमी राहते. तसेच उच्च तापमानामुळे बाष्पीभवन वाढून पिकाची पाण्याची गरज
वाढते. एकूणच, EL-Nino मूळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊन शेती उत्पादनावर नकारात्मक
परिणाम होण्याची शक्यता आहे.
EL-Nino चा संभाव्य
धोका लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यात शिवार फेरी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. शिवार फेऱ्यांमध्ये
प्रतिबंधात्मक उपाय जसे 1. मुलस्थानी जलसंधारणाच्या उपाययोजना जसे उताराला आडवी नांगरणी
/ पेरणी, आंतर मशागत, मृत सरी काढणे, रुंद सरी वरंबा पेरणी, आच्छादानाचा वापर इ. राबविण्यासाठी
शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे. 2. संरक्षित सिंचनाची सोय करण्यासाठी शेततळे,
जलकुंड व प्लास्टिक अस्तरीकरण सारख्या बाबींना प्रोत्साहन देणे. 3. मृद व जलसंधारणासाठी
क्षेत्र उपचार जसे जुभादु, मजगी, जलतारा, शेत शोषखड्डा व नाला उपचार जसे माती नाला
बांध, अनघड दगडी बांध, गॅबियन बंधारे व वनराई बंधारे राबविणे इ. प्रतिबंधात्मक उपाय
म्हणून अंमलबजावणी करण्याबाबत शेतकऱ्यांना ठाणे जिल्ह्यात कृषि विभागामार्फत आवाहन
करण्यात येत आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. रामेश्वर पाचे यांनी
कळविले आहे.
000000000
Comments
Post a Comment