महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची व्दिवार्षिक निवडणूक 2026

 



 

 

ठाणे दि.19(जिमाका) :- मा. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

हा कार्यक्रम निवडणुकीची सूचना प्रसिध्द करणे - 25 मे, 2026 (सोमवार). नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम तारीख - 01 जून 2026 (सोमवार). नामनिर्देशनपत्राची छाननी - 02 जून, 2026 (मंगळवार). उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख - 04 जून, 2026 (गुरुवार). मतदानाची तारीख - 18 जून, 2026(गुरुवार). मतदानाची वेळ - सकाळी 08.00 ते सायं. 4.00. मतमोजणी - 22 जून, 2026 (सोमवार). निवडणूकांचे कामकाज पूर्ण करणे - 25 जून, 2026 (गुरुवार), असा असल्याची माहिती ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी रुपाली भालके यांनी कळविले आहे.

00000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न