स्वगणना करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हा जनगणनेचा शुभारंभ
ठाणे,दि.01(जिमाका) : राष्ट्रीय
जनगणनेला आजपासून देशव्यापी सुरुवात झाली असून उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वगणना करीत ठाणे जिल्ह्यातील जनगणनेचा शुभारंभ
केला. या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.
ठाणे महापालिकेच्या
मुख्यालयात झालेल्या या शुभारंभ कार्यक्रमासाठी महापौर शर्मिला पिंप्रोळकर,
उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण
पांचाळ, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, जनगणना सहसंचालक रमेश भोसले आदी मान्यवर
उपस्थित होते.
यावेळी स्वगणनेसाठी असलेल्या
क्यूआर कोडचे अनावरण उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यांनी टॅब
वर हा कोड स्कॅन करून स्वगणना केली. दिनांक १ ते १५ मे हा स्वगणनेचा
कालावधी असून त्यानंतर १६ मे ते १४ जून याकलावधीत घरोघरी जाऊन
जनगणना केली जाणार आहे.
यावेळी विकास आणि प्रगती या
स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. जनगणनामोहिमेसाठी तयार करण्यात आलेल्या सेल्फी
पॉइंटचे उद्घाटन देखील त्यांनी केले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांना
सहसंचालक भोसले यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्रालयाचे स्मृती चिन्ह देण्यात आले.
000000000
Comments
Post a Comment