ठाणे जिल्हा प्रशासनाची माहिती औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना सज्ज नियंत्रण कक्ष व आपत्कालीन संपर्क क्रमांक जाहीर
ठाणे दि.20(जिमाका) :-अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना
(All India Organization of Chemists and Druggists) यांच्या वतीने बुधवार, दिनांक
२० मे २०२६ रोजी देशव्यापी एकदिवसीय बंदची घोषणा करण्यात आली आहे. या बंदच्या
पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना आवश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत व
अखंडपणे उपलब्ध राहावा, यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) सज्ज झाले आहे.
प्रशासनामार्फत जिल्ह्यात आवश्यक त्या सर्व उपाययोजना पूर्ण करण्यात आल्याची
माहिती अन्न व औषध प्रशासन, ठाणे कार्यालयाचे सह आयुक्त (औषधे) श्री. भूषण पाटील
यांनी दिली आहे.
सह
आयुक्त (औषधे) तथा नियंत्रण प्राधिकारी यांच्या निर्देशानुसार, जिल्ह्यातील सर्व
औषध विक्रेते, रुग्णालयांशी संलग्न औषध दुकाने तसेच २४ तास सुरू असणाऱ्या औषध
दुकानांशी समन्वय साधण्यात आला आहे. अत्यावश्यक औषधांचा पुरवठा खंडित होणार नाही,
यासाठी संबंधित घटकांना पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय
जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, इंडियन
मेडिकल असोसिएशन (IMA) तसेच खाजगी व निमसरकारी रुग्णालये यांच्याशी संपर्क ठेवून
आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे.
व्यापक
जनहित लक्षात घेऊन जिल्ह्यातील औषध विक्रेता संघटनेच्या सदस्यांनी नियोजित
बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. किरकोळ व घाऊक
विक्रेत्यांशी वैयक्तिक स्तरावर संपर्क साधून त्यांना संपामध्ये सामील न
होण्याबाबत विनंती करण्यात येत आहे. संपाच्या काळात रुग्णांची
गैरसोय होऊ नये म्हणून काही दुकाने सुरूच राहतील, याची दक्षता घेण्याच्या सूचना
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सर्व शासकीय, निमसरकारी व खाजगी
रुग्णालयांना आवश्यक औषधांचा मुबलक साठा आगाऊ उपलब्ध करून ठेवण्याची विनंती
करण्यात आली आहे. तसेच, औषध पुरवठा सुरू ठेवणाऱ्या विक्रेत्यांना आवश्यक ते
सहकार्य व संरक्षण देण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
नागरिकांना
औषधे खरेदी करता यावीत म्हणून ठाणे जिल्ह्यातील खालील नामांकित औषध दुकाने
(फार्मसी चेन्स) नियमितपणे सुरू राहतील: मेडप्लस केमिस्ट अँड ड्रगिस्ट (MedPlus),
अपोलो फार्मसी (Apollo Pharmacy), वेलनेस फॉरेव्हर (Wellness Forever), झेनो हेल्थ
(Zeno Health)
नागरिकांनी
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. औषध पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण उद्भवल्यास
किंवा आणीबाणीच्या प्रसंगी औषधांची आवश्यकता भासल्यास नागरिकांनी अन्न व औषध
प्रशासन, ठाणे कार्यालयाच्या fdathnkd@gmail.com या ई-मेलवर किंवा खालील नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकांवर
संपर्क साधावा.
कार्यालयाचा पत्ता: सह आयुक्त (कोकण विभाग),
अन्न व औषध प्रशासन, म.रा., वरदान (MIDC) बिल्डिंग, १ ला मजला, रोड नं. १६, वागळे
इस्टेट, ठाणे (पश्चिम) - ४००६०४.
संपर्क
अधिकारी व भ्रमणध्वनी क्रमांक श्री. भूषण पाटील (सह आयुक्त - औषधे)कोकण
विभाग९६८९५५१६६६, श्री. नि. पा. आहेर (सहाय्यक आयुक्त)परिमंडळ -९२२४३६२०८१,
श्रीमती शु. सं. भुजबळ (औषध
निरीक्षक)परिमंडळ -९९६९३६३५०७, श्री. बो. ह. पोळ (औषध निरीक्षक)परिमंडळ -९४२१९६२४०१,
श्रीमती रा. दि. शिंदे (औषध
निरीक्षक)परिमंडळ – १९३७१९८३५११,श्री. मु. मा. डोंगळीकर (सहायक आयुक्त)परिमंडळ-९८९२७६२२९४,श्री.
जो. मॅ. चिरामेल (औषध
निरीक्षक)परिमंडळ-८७७९६५२८८०, श्री. पी. व्ही. ब्राम्हणकर (औषध निरीक्षक)परिमंडळ – ८७८०१८६६८२-
श्री. सं. ने. काले (सहायक
आयुक्त)परिमंडळ - ३ व ९८६७२५८२५९,
श्री. स. अ. कांबळे (सहाय्यक
आयुक्त)परिमंडळ-७३८७१११९९५, श्री. पी. एम. साखरे (औषध निरीक्षक)परिमंडळ – ९७६७७६८८४०,
श्री. रो. शं. राठोड (सहायक
आयुक्त)परिमंडळ - ६ व ९५४५९६०७९९,
श्री. बी. पी. देवेकर (औषध
निरीक्षक)परिमंडळ – ७८७९३६७२००९.
00000
Comments
Post a Comment