जलतारा भूजल पाणी पातळी वाढविण्यासाठी एक वरदान
ठाणे दि.२१(जिमाका) :- Catch The Rains When It Falls
Where it Falls ही संकल्पना राबविण्याकरिता पावसापासून उपलब्ध पाण्याच्या प्रत्येक
थेंबाचे जतन करण्यासाठी शेत जमिनीच्या प्रत्येक एक एकर शेतीमधील उताराचे ठिकाण शोधून
जलतारा करावयाचा आहे. साधारणपणे असे म्हटले जाते की, पडणाऱ्या पावसाचे 35% पाणी वाहून
जाते हे वाहुन जाणारे पाणी जलतारा उपचार माध्यमातून पाणी अडवून जिरवणे शक्य होत आहे.
यामुळे सिंचन विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होते. तसेच अतिरीक्त पाण्यामुळे जमीन चिबड
होण्यापासुन बचाव होतो. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेचा मूलभूत उद्देश ग्रामीण
कुटुंबातील प्रौढ व्यक्तींना अकुशल कामाची मागणी केल्यानंतर कामे उपलब्ध करून देणे
आहे. तसेच जलताराच्या माध्यमातून संरक्षित सिंचनाची व्यवस्था शेतकऱ्यास उपलब्ध करणे
हा मुख्य हेतू आहे.
1) शेताच्या
निवड केलेल्या उतार भागात 5 फुट (रुंदी) X 5 फुट (लांबी) X 6 फुट खोलीचा एक खड्डा तयार
करावा. (1.5 मी X 1.5 मी. X 1.80 मी). 2) हा खड्डा मोठ्या आकाराच्या कठीण प्रकारच्या
(टोळ) प्राधान्याने 80 mm तसेच 100 mm आकाराच्या दगडाने भरावा. 3) एक जलतारा खड्डा
4 महिन्यात 3.60 लक्ष लिटर पाणी जमीनीमध्ये मुरवतो.
यंदा एल निनोचा
प्रभाव असल्याने पाऊस कमी पडण्याचा अंदाज असल्याने पडलेला प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्याचे
व त्याकरिता ठाणे जिल्ह्यात 1080 जलतारा तयार करण्याचे नियोजन कृषि विभाग जि. ठाणे
यांच्यामार्फत करण्यात आले आहे. तसेच जास्तीत जास्त जलतारा खोदण्याचे आवाहन जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे रामेश्वर पाचे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
000000000
Comments
Post a Comment