ग्रंथालय संचालनालयाच्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेंतर्गत 50 व्या ग्रंथभेट योजनेसाठी निवड झालेल्या ग्रंथांची यादी संकेतस्थळावर जाहीर
ठाणे,दि.30(जिमाका) : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून 50 व्या ग्रंथभेट योजनेंतर्गत सन 2023 मध्ये प्रकाशित व संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमिती सदस्यांनी निवड केलेल्या 1388 ग्रंथांची यादी (मराठी - 749, हिंदी - 297, व इंग्रजी - 342) ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि.26 सप्टेंबर, 2025 ते दि. 15 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत अवलोकनार्थ खुली ठेवण्यात आलेली आहे. या ग्रंथ यादीतील ग्रंथ किमान 25 टक्के सूट दराने वितरीत करणे बंधनकारक आहे. या ग्रंथयादीतील कोणत्याही ग्रंथाबाबतची सूचना/ हरकती/ आक्षेप असल्यास दि.15ऑक्टोबर, 2025 पर्यंत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई – 400 001 यांच्याकडे लेखी स्वरुपात कार्यालयीन वेळेत हस्तबटवड्याने वा पोस्टाने अथवा उपरोक्त नमूद केलेल्या ई-मेल वर पाठवावेत. मुदतीनंतर प्राप्त सूचनांचा/हरकतींचा/आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. यादीत ग्रंथांचे नाव, लेखक, प्रकाशक व किंमत यामध्ये काही बदल असल्याच...