Posts

Showing posts from April, 2026

ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मतदारयादीतील 'मॅपिंग' प्रक्रियेत सहभागी व्हावे- डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

Image
ठाणे , दि.02(जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या ' विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची ' (SIR) पूर्वतयारी सध्या सुरू आहे. या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व 18 विधानसभा मतदारसंघांतील मतदारांचे ' सन 2002 च्या मतदार यादीशी मॅपिंग ' करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून , नागरिकांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा , असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. मॅपिंग प्रक्रिया नेमकी काय आहे ?     सन 2002 मध्ये शेवटचा सखोल पुनरिक्षण कार्यक्रम झाला होता. आता पुन्हा तीच प्रक्रिया राबवली जाणार असल्याने , सध्याच्या मतदार यादीतील नावांची जुन्या (2002 च्या) नोंदींशी सांगड घातली जात आहे. हे मॅपिंग दोन प्रकारे करता येईल: 1. Person to Person Mapping: ज्या मतदारांचे नाव 2002 च्या यादीत आधीपासूनच होते , त्यांनी थेट स्वतःच्या नावाचे मॅपिंग करावे. 2. Progeny Mapping: ज्या तरुण मतदारांची नावे 2002 मध्ये नव्हती , त्यांनी आपल्या आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या 2002 मधील नावाचा आधार घेऊन आपले नाव लिंक ...

सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक

समितीची नोंदणी SHE BOX PORTAL वर करण्याबाबत केंद्र शासनाचे निर्देश   ठाणे , दि.2(जिमाका):-   कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 ( Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी Posh Act 2013 मधील कलम 4(1) अन्वये ज्या कार्यालयामध्ये 10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी असतील अशा सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. तसेच सदरील अंतर्गत समितीची नोंदणी SHE BOX PORTAL वर करण्याबाबत केंद्र शासनाचे निर्देश आहेत. त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांनी SHE BOX PORTAL वर नोंदणी करण्याबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नमिता शिंदे यांनी आवाहन केले आहे. वारंवार आवाहन करुनही ठाणे जिल्ह्यातील खाजगी आस्थापना शाळा , कॉलेज , खाजगी कंपन्या , कारखाने , बँका , हॉस्पिटल्स , हॉटेल , शॉप अॅक्ट अंतर्गत नोंदणीकृत सर्व खाजगी आस्थापना इत्यादी सर्व आस्थापनांनी SHE BOX PORTAL वर आपल्या आस्थापनेची व अंतर्गत समितीची नोंदणी केलेली नाही. त्यामुळे या खाजगी आस्थापनांनी तात्काळ आपली नोंदणी SHE BOX PORTAL वर करावी , ज्या खाजगी आस्थापन...

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील दौरा कार्यक्रमाच्या वारामध्ये प्रशासकीय कारणास्तव बदल

ठाणे , दि.2(जिमाका):- प्रादेशिक परिवहन कार्यालय , ठाणे या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात यापूर्वी आठवड्यातील मंगळवार ते शुक्रवार या वारामध्ये नागरीकांच्या सोईकरीता दौरा कार्यक्रमाचे आयोजन करुन नागरीकांची कामे करुन देण्यात येत आहेत. या दौरा कार्यक्रमाच्या वारामध्ये प्रशासकीय कारणास्तव बदल करण्यात आलेले आहेत. तसेच काही दौरा ठिकाणी दौऱ्याचे दिवस वाढविण्यात आलेले आहेत. यापूर्वी दर मंगळवारी शहापूर येथे दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात येत होता. त्याऐवजी आता दर सोमवारी आयोजित करण्यात येणार आहे. तसेच भिवंडी येथील दौरा कार्यक्रमामध्ये अतिरिक्त दिवसाची वाढ करण्यात येत असून दर मंगळवारी भिंवडी येथे दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. याची संबंधित वाहन चालक मालक व नागरीकांनी नोंद घ्यावी , असे ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी कळविले आहे. 00000

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन

Image
ठाणे , दि.2(जिमाका):- कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 ( Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी Posh Act 2013 मधील कलम 6(1) अन्वये ज्या आस्थापनेमध्ये 10 पेक्षा कमी कर्मचारी असतील किंवा जेथे नियुक्ती प्राधिकाऱ्याविरूध्द तक्रार असेल तर अशा तक्रारी जिल्हास्तरीय स्थानिक समितीकडे करता येतील , अशी तरतूद दि.11 सप्टेंबर 2014 रोजीच्या शासन निर्णयान्वे करण्यात आलेली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यासाठी स्थानिक समिती कार्यरत आहे. त्यानुसार घरकाम करणाऱ्या महिला , बांधकाम क्षेत्रात कार्रत महिला , तसेच इतर असंघटीत क्षेत्रातील कार्यरत महिला कामगार किंवा जेथे नियुक्ती प्राधिकाऱ्याविरूध्द तक्रार करावयाची असेल अशा महिलांनी त्यांच्यासोबत झालेल्या लैंगीक हिंसाचाराबाबत जिल्हास्तरीय स्थानिक समितीकडे 90 दिवसांच्या आत तक्रार दाखल करावी , असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नमिता शिंदे यांनी केले आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय , पहिला मजला , नियोजन भवन इमारत , कोर्ट नाका , ठाणे या पत्त्यावर प्रत्यक्ष येऊन किंवा Shebox.wcd.gov.in   वर R...

जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालयांमध्ये दि.09 मे 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

ठाणे , दि. 2( जिमाका):- दाखल पूर्व ही प्रकरणे ठेवता येतील -   धनादेश अनादर प्रकरणे , बॅंकेचे कर्ज वसूली प्रकरणे , कामगारांचे वाद , कर वसुलीचे प्रकरणे , विद्युत आणि पाणी देयक बद्दलची प्रकरणे आणि इतर आपसात तडजोड पात्र प्रकरणे , वैवाहिक व इतर दिवाणी वाद ही प्रकरणे ठेवता येतील. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे ठेवता येतील - आपआपसात तडजोड करण्याजोगे फौजदारी प्रकरणे , मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे , वैवाहिक वाद , कामगारांचे वाद , भूसंपादन प्रकरणे , विद्युत आणि पाणी देयक बद्दलचे प्रकरणे , सेवा विषयक पगार , भत्ते व सेवा निवृत्तीचे फायदे-विषयक प्रकरणे , महसूल प्रकरणे , इतर दिवाणी प्रकरणे जसे भाडे , वहिवाटीचे हक्क ,   मनाई हुकमाचे दावे , विशिष्ट पूर्व बंध कराराची पूर्तता विषयक वाद आदी न्यायालयात प्रलंबित प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवता येतील. मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास ब्रि. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार , दि. 09 मे 2026 रोजी ‘राष्ट्रीय लोकअदालत’ चे आयोजन करण्यात आले आहे. न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे आणि दाखल पूर्व प्रकरणे सुनावणीसाठी लोक अदालतीम...