ठाणे-पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026 आज अखेर 2 उमेदवारांची 5 नामनिर्देशन पत्रे दाखल मंगळवारी छाननी

 





ठाणे,दि.1(जिमाका): महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज संस्थेची द्विवार्षिक निवडणूक 2026 ठाणे तथा पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी आजअखेर एकूण 2 उमेदवारांची 5 नामनिर्देशन पत्रे दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

अभिजित अंकुश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) आणि रवींद्र फाटक (शिवसेना) यांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

            आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. एकूण 2 उमेदवारांची आजच्या दिवशी एकूण 5 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. उद्या मंगळवार,दि.2 जून रोजी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे.

00000000

 

 

 


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न