सन 2026-27 कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण तुर करीता लाभार्थ्यांचे महाडीबीटी वर अर्ज करण्याचे आवाहन

 



 

ठाणे,दि.04(जिमाका) :- सन 2026-27 कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण तुर करीता लाभार्थ्यांचे महाडीबीटी वर अर्ज करावेत.

लाभार्थी निवड निकष :- 1. प्रमाणित बियाणे वितरण या घटाकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी कमाल १ हेक्टर पर्यंत मर्यादित आहे. 2. या प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे व शेतकऱ्यांचा Agristack Farmer ID असणे बंधनकारक आहे.           3. शेतकऱ्यास संबंधित बियाणे पुरवठादार संस्थेच्या वितरकामार्फत 7/12 उताऱ्याच्या आधारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) तत्त्वावर प्रमाणित बियाणे वितरण संबंधित संस्थेनी करावे. 4. प्रमाणित बियाणे वितरणासाठी 5 वर्षा आतील (अधिसूचनेच्या 3 वर्षांनंतर 5 वर्षे विचारात घेतली जातील) अधिसुचित वाण प्रमाणित बियाणे वितरण अंतर्गत अनुदानास पात्र ठरतील. 5. तुर प्रमाणित बियाणे वितरणासाठी 5 वर्षा आतील वाण करीता रू.6000/- प्रति क्विंटल व 5 वर्षा वरील परंतु 10 वर्षा आतील वाण करीता रु.3000/-प्रति क्विंटल शासकीय अनुदान असून उर्वरित रक्कम लाभार्थी हिस्सा शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना द्यावा लागेल. 6. वितरकांनी दर्शनी भागावर कडधान्य आत्मनिर्भरता अभियानातंर्गत प्रमाणित बियाणे अनुदानावर उपलब्ध असल्याचा फलक लावावा. बियाण्याचे वाणनिहाय दर अनुदान व अनुदान वजा जाता पॅकींगनिहाय येणारी किंमत याची माहिती संबंधित वितरकाने फलकावर प्रदर्शित करणे आवश्यक आहे. 7. संबंधित वितरकांनी अनुदान वजा जाता येणारी किंमत लाभार्थी शेतकऱ्यांकडून घेउन शेतकऱ्यांना बियाणे वितरीत करावे. 8. विहित केलेल्या प्रमाणानुसार अनु.जाती 12 टक्के, अनु. जमाती 9 टक्के व सर्वसाधारण प्रवर्गासाठी 79 टक्के प्राधान्यक्रमाच्या लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ पोहचेल या करीता प्रवर्गनिहाय लाभास प्राधान्य. 9. ठाणे जिल्ह्यामध्ये कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत तुर प्रमाणित बियाणे वितरण घटकांतर्गत भौ. 20.00 क्वि. व आर्थिक 0.90 लाख एवढा लक्षांक प्राप्त झालेला आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे रामेश्वर पाचे यांनी केले आहे.

0000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न