सन 2026-27 कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत प्रक्रिया युनिट स्थापना करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
ठाणे,दि.04(जिमाका) :- सन 2026-27 कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत प्रक्रिया
युनिट स्थापना करणेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक
कृषि अधिकारी, ठाणे रामेश्वर पाचे यांनी केले आहे.
कडधान्य पिकांच्या
मूल्यवर्धनास चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने काढणीनंतरची
पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कडधान्य प्रक्रिया युनिट (Processing Unit) स्थापन
करण्यास आर्थिक सहाय्य प्रदान करणे.
या योजनेंतर्गत शेतकरी
उत्पादक संस्था(FPO), क्लस्टर स्तर महासंघ (CLF), प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS),
उद्योजक तसेच प्रक्रिया युनिट स्थापन करण्यास इच्छुक इतर पात्र व्यक्ती/संस्था
यांना सहाय्य देऊन कडधान्य मूल्यसाखळी अधिक कार्यक्षम व सक्षम करणे हा मुख्य
उद्देश आहे.
पात्र लाभार्थी घटक :- योजनेंतर्गत पुढील
प्रमाणे घटकांना आर्थिक सहाय्य देण्यात येईल - शेतकरी उत्पादक संस्था (FPOs), क्लस्टर स्तर महासंघ
(CLFS), प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), वैयक्तिक अर्जदार, कोणत्याही अधिनियमांतर्गत
नोंदणीकृत इतर उपक्रम.
पात्रता निकष - a) गट लाभार्थी
(FPO/Cluster Level Federation (CLFs) Primary Agricultural Credit Societies
(PACS) - संबंधित
संस्था किमान मागील दोन वर्षापासून विधिवत नोंदणीकृत व कार्यरत असावी. प्रकल्प
खर्चाच्या किमान 15% रक्कम तसेच कार्यभांडवलासाठी आवश्यक मार्जिन मनी स्वतः
उभारण्याची आर्थिक क्षमता असावी.
b) वैयक्तिक लाभार्थी - अर्जदाराचे वय किमान 21 वर्षे पूर्ण असावे. एका
कुटुंबातील (स्वतः, पती/पती व अविवाहित मुले) केवळ एका व्यक्तीस आर्थिक सहाय्य
मंजूर करण्यात येईल. प्रकल्प खर्चाच्या किमान 15% रक्कम तसेच कार्यभांडवलासाठी
आवश्यक मार्जिन मनी स्वतः उभारण्याची आर्थिक क्षमता असावी. अनुसूचित जाती/जमाती,
महिला, डोंगराळ क्षेत्रे व आकांक्षी तालुके यांना प्राधान्य असेल.
अर्थसहाय्य प्रमाण - a) आर्थिक सहाय्य -
प्रकल्प खर्चाच्या 33% किंवा
कमाल रु.25.00 लाख प्रति युनिट (यापैकी जे कमी असेल ते). अनुदान केवळ यंत्रसामग्री
(Plant & Machinery) खरेदी तसेच इमारत/गोदाम/साठवण पायाभूत सुविधा
बांधकामासाठी दिले जाईल. जमीन, वीज, मनुष्यबळ इत्यादी खर्चासाठी अनुदान देय राहणार
नाही. तसेच, इमारत/गोदाम/साठवण पायाभूत सुविधांच्या बांधकामामाठी अनुदानाचा
जास्तीत जास्त हिस्सा एकूण पात्र अनुदानाच्या 30% पर्यंत असेल (म्हणजे प्रकल्प
खर्चाच्या 33% किंवा रु.25लाख, यापैकी जे कमी असेल ते). हे सहाय्य हे अनुदान
स्वरुपात असून उर्वरित रक्कम अर्जदाराने मार्जिन मनी/बँक कर्जाद्वारे उभारणे
आवश्यक राहील.
b) भांडवली आवश्यकता - शासकीय अनुदान
एकूण प्रकल्प खर्चापैकी ठराविक खर्चाची पूर्तता करीत असल्याने उर्वरित रक्कम लाभार्थ्याने
पुढील प्रमाणे उभारावी : 1. स्व:ताचे
भांडवल योगदान (किमान 15%). 2. बँक/वित्तीय संस्थांकडून मुदत कर्ज किंवा कार्यभांडवल
कर्ज. 3. कृषी पायाभूत सुविधा निधी (Agriculture Infrastructure Fund AIF) व इतर
राज्यस्तरीय योजनांचा लाभ. 4 ग्रामीण विकास, कृषी उद्योग किंवा सूक्ष्म उद्योग
योजनांमधील उपलब्ध अनुदान.
कडधान्य अभियानांतर्गत आर्थिक सहाय्य
मिळविण्यासाठी बँक कर्ज घेणे अनिवार्य आहे.
ठाणे जिल्ह्यामध्ये कडधान्य
आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत प्रक्रिया युनिट स्थापना घटका अंतर्गत भौ - 1 व आर्थिक
- 25.00 लाख एवढा लक्षांक प्राप्त झालेला आहे. लाभार्थींनी तात्काळ संबंधित तालुका
कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करून अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी
अधिकारी, ठाणे रामेश्वर पाचे यांनी केले
आहे.
0000000000
Comments
Post a Comment