अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त श्री.तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात सलग धाड सत्र
ठाणे दि.05(जिमाका) :- अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्याचे आयुक्त श्री.तुकाराम मुंडे यांच्या
मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात
अन्न सुरक्षा कायदा व नियमांची
प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सलग धाड सत्र राबविण्यात येत आहे. या अंतर्गत कोकण
विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी यांनी ठाणे,नवी
मुंबई,मीरा भाईंदर,भिवंडी या परिसरासह इतर
भागात दिनांक २ जून व ३ जून २०२६ रोजी अचानक तपासणी मोहिमा राबवून मोठी कारवाई केली आहे.
या धाड
सत्रादरम्यान कोकण विभागाने दिनांक २ जून
ते ३ जून २०२६ या कालावधीत प्रतिबंधित (गुटखा,
पान मसाला, सुगंधित सुपारी) अन्न
पदार्थांविरोधात ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी (ठाणे
,कल्याण,अंबरनाथ,बदलापूर) या ठिकाणी व्यापक धाड सत्र
राबविण्यात आले असून एकूण १७ आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत रुपये 295,660/- किमतीचा गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व तत्सम
प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. संबंधित विक्रेत्यावर
पोलीस ठाण्यामध्ये पुढील तपासासाठी एकूण ०७ प्रथम खबरी अहवाल (FIR) दाखल करण्यात आले
असून एकूण १७ व्यक्तींना अटक
करण्यात आली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण १७ आस्थापनांना सील करण्यात आले आहे.
दिनांक
२ जून २०२६ रोजी ठाणे जिल्ह्यामध्ये नवी मुंबई या ठिकाणाहून अनुक्रमे खवा (१४4
किलो) किमत रुपये ४७५२०/-,दही (६१८ किलो) किमत
रुपये ५५६२०/- तसेच मीरा रोड या
परिसरातून Nutrila Weight Gain चा ६ किलो चा रुपये
१२०००/- चा साठा लेबलदोष असलेले व भेसळीचा संशय असलेले जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अन्नपदार्थांवर
"इलेक्ट्रोलाइट ड्रिंक" सारख्या अघोषित वर्णनांचा आणि अस्वीकार्य
उपचारात्मक दाव्यांच्या वापरास प्रतिबंध करणाऱ्या FSSAI मुख्यालयाच्या
निर्देशानुसार भिवंडी
परिसरातून Ready
To Serve Fruit Beverages ) (eRZL Apple), Ready To Serve Fruit Beverages ) (eRZL
Plus Active), Ready To Serve Fruit Beverages ) (eRZL REHYDRATE), Ready To Serve
Fruit Beverages ) (eRZL Orange), Ready To Serve Fruit Beverages ) (eRZL
REHYDRATE+ Orange) चा रुपये 1,653,718.07/- किमतीचा साठा
जप्त करण्यात आलेला आहे.
दिनांक
३ जून २०२६ रोजी ठाणे जिल्हामध्ये नवी मुंबई
परिसरात लेबलदोष असलेले व भेसळीचा संशय असलेले मिरची पावडर व हळद पावडर, अख्खा
हिंग, मोठी इलायची व गरम मसाले, तीळ अश्या प्रकारच्या अन्न पदार्थांचा 38,056.6 किलोचा साठा ज्याची किमत रुपये 7,479,260/- असून सदरचा साठा जप्त करण्यात आलेला आहे.
तसेच दिनांक ३ जून २०२६ रोजी
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कुकसे गावात
ERZL Electrolyte drink (lemon), ERZL Electrolyte
drink (Orange), ERZL Electrolyte drink (Apple),
ERZL Advanz Care Electrolyte drink (Plus Active), ERZL Advanz Care Electrolyte चे विविध फ्लेवर्स जसे Lamon,Orange,Apple,Plus Active चा साठा उपरोक्त नमूद FSSAI च्या निर्देशानुसार एकूण
रुपये 22,426,087.5/-
किमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. तसेच दिनांक ३ जून २०२६ रोजी भाईंदर ERZL Advanz
Care Electrolyte drink (Rehydrate Plus) (Apple), Electrolyte drink ERZL Plus Active, Enerzal Orange Electrolyte
drink हे सर्व 200 ml च्या Tetra Packs
मध्ये असुन त्यांची एकूण
रुपये 184,607/-
किमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे.
अन्न व
औषध प्रशासनाकडून अशा प्रकारच्या धाड सत्रांची मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार
आहे. प्रतिबंधित पदार्थांविषयी व अन्न भेसळी विषयी कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
दिनांक २ व ३ जून २०२६ या
कालावधीत प्रतिबंधित (गुटखा, पान
मसाला, सुगंधित सुपारी) अन्न पदार्थांचा रुपये 295,660/- किमतीचा साठा आणि इतर अन्न पदार्थाचा रुपये 3,19,29,012/- किमतीचा साठा जप्त
करण्यात आला आहे.
जनतेस
कळविण्यात येते की, प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या १००% अंमलबजावणीसाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे. कोणतीही तक्रार किंवा
माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क करावा अथवा सह आयुक्त
(कोकण विभाग), यांचे कार्यालय, अन्न व औषध प्रशासन, म.राज्य, वरदान
एमआयडीसी बिल्डींग, तळमजला, वागळे
ईस्टेट, रोड नं. १६, ठाणे (प), ठाणे ४००६०४ येथे संपर्क साधावा, असे सह आयुक्त (अन्न), कोकण विभाग यांनी आवाहन केले आहे.
000000000000
.jpeg)
Comments
Post a Comment