मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी, अमृत मानस मित्र चे मोफत प्रशिक्षण रोजगार आणि स्वयंरोजगारा च्या अनेक संधी उपलब्ध. मानसिक आरोग्य क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम
ठाणे,दि.10(जिमाका)
:- आजच्या वेगाने
बदलणाऱ्या शैक्षणिक आणि सामाजिक वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक ताणतणाव, भावनिक
समस्या, वर्तनात्मक अडचणी, सोशल मीडिया व डिजिटल व्यसन, करिअरविषयक संभ्रम, तसेच मानसिक
आरोग्याशी संबंधित विविध आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. आणि त्यामुळे अनेक गंभीर
घटना आणि समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये
प्रशिक्षित समुपदेशकांची गरज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही गरज आणि समस्या लक्षात घेऊन
अमृत या संस्थेने ही सामाजिक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे.
महाराष्ट्र
शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) मार्फत
"अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम" राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH), पुणे ही महाराष्ट्र
शासनाची मानसिक आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था तांत्रिक भागीदार (Technical
Partner) म्हणून कार्यरत राहणार आहे.
MIMH
ही मानसिक आरोग्य क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि क्षमता विकासासाठी कार्यरत
असलेली महाराष्ट्र शासनाची प्रमुख संस्था असून मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ते
आणि विविध मानसिक आरोग्य व्यावसायिकांच्या प्रशिक्षणामध्ये संस्थेचा दीर्घ अनुभव आहे.
या अनुभवाच्या आधारे प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम, प्रशिक्षण पद्धती, पर्यवेक्षण
(Supervision) आणि गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी MIMH मार्फत पार पाडण्यात येणार आहे.
अमृत
संस्थेमार्फत "समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम" राबविण्यात येत असून मानसशास्त्र,
समुपदेशन आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील युवक-युवतींसाठी स्वयंरोजगार, व्यावसायिक विकास
आणि समाजोपयोगी कार्याची रोजगार आणि स्वयंरोजगार यासाठी मोठी संधी उपलब्ध होत आहे.
अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण
कार्यक्रमात काय आहे? अमृत मानसमित्र कार्यक्रमांतर्गत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या
मानसिक आरोग्य, भावनिक स्वास्थ्य आणि जीवनकौशल्य विकासासाठी प्रशिक्षित समुपदेशक तयार
करण्यात येणार आहेत.
प्रशिक्षणामध्ये
खालील बाबींचा समावेश असेल : 1. विद्यार्थी
समुपदेशनाची मूलतत्त्वे. 2. बाल व किशोर मानसिक आरोग्य. 3. संवाद कौशल्ये व सक्रिय
श्रवण. 4. तणाव व्यवस्थापन व भावनिक स्वास्थ्य. 5. जीवनकौशल्य शिक्षण. 6. आत्महत्या
प्रतिबंध आणि संकट व्यवस्थापन. 7. सायबर सुरक्षा व डिजिटल आरोग्य. 8. पालक व शिक्षकांसोबत
समन्वय. 9.मानसिक आरोग्य जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन. 10. शाळा आधारित समुपदेशन व
रेफरल प्रणाली.
प्रशिक्षणानंतर
उपलब्ध होणाऱ्या संधी : प्रशिक्षण
पूर्ण केलेल्या उमेदवारांना खालील क्षेत्रांमध्ये कार्य करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते
:
●
शाळा
व महाविद्यालयीन समुपदेशक,
●
मानसमित्र
समुपदेशक
●
जीवनकौशल्य
प्रशिक्षक
●
मानसिक
आरोग्य जनजागृती प्रशिक्षक
●
पालक
व शिक्षक कार्यशाळा समन्वयक
●
विद्यार्थी
कल्याण अधिकारी
●
स्वयंरोजगाराच्या
माध्यमातून समुपदेशन सेवा
कौशल्य
विकास प्रशिक्षण : अमृत मानसमित्र
अंतर्गत विद्यार्थी समुपदेशकांसाठी विशेष कौशल्य विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार
आहे. प्रशिक्षणामध्ये सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष समुपदेशन कौशल्ये, केस स्टडी,
रोल प्ले, सुपरव्हिजन, मार्गदर्शन आणि क्षेत्रीय अनुभव यांचा समावेश असेल.
प्रशिक्षणाचे
स्वरूप - प्रशिक्षणाचे स्वरूप हायब्रीड
(ऑफलाइन + ऑनलाइन) असेल.
●
15
दिवसांचे प्रत्यक्ष वर्ग प्रशिक्षण
●
एक
महिन्याची निरीक्षणाधारित क्षेत्रीय नियुक्ती
● ऑनलाइन तज्ज्ञ
सत्रे व केस चर्चा, सहा महिन्यांचे मार्गदर्शन व सुपरव्हिजन यामुळे कार्यरत व्यावसायिक,
विद्यार्थी आणि इतर इच्छुकांना प्रशिक्षणात सहभागी होणे सुलभ होईल.
किती
जणांना संधी आणि निवड प्रक्रिया कशी? :- प्रत्येक
जिल्ह्यातील गरज, विद्यार्थी संख्या आणि उपलब्ध संसाधनांचा विचार करून प्रशिक्षणार्थ्यांची
निवड केली जाईल. सर्वसाधारणपणे प्रत्येक बॅचमध्ये
किमान 20 ते कमाल 30 उमेदवारांना प्रवेश
दिला जाईल.
पात्रता
निकष : खालील शैक्षणिक पात्रता असलेले
अमृतच्या लक्षित गटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
●
एम.ए./एम.एस्सी.
मानसशास्त्र
●
एम.ए./एम.
एस्सी. समुपदेशन मानसशास्त्र
●
मास्टर
ऑफ सोशल वर्क (MSW)
● अमृतच्या लक्षित गटातील उमेदवार असल्याचे पुरावे ( डोमेसाईल, उत्पन्नाचा
दाखला, जातीचा पुरावा )
प्रशिक्षण स्थळ
आणि निवासी व्यवस्था :- सहा महिन्याच्या एकूण प्रशिक्षण कार्यक्रमापैकी पंधरा दिवस
ऑफलाइन प्रशिक्षण हे महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे येथे होणार आहे. या 15
दिवसांसाठी निवास आणि भोजनाची व्यवस्था विद्यार्थ्यांनी स्वतः करायची आहे.
मोफत प्रशिक्षण
अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांचा या
सहा महिन्याच्या प्रशिक्षणाचा शैक्षणिक खर्च अमृत या संस्थेमार्फत केला जाणार आहेत.
म्हणजेच अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांना मोफत प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे.
प्रशिक्षण प्रमाणपत्र
आणि त्याचे फायदे
प्रशिक्षण
यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना "अमृत मानसमित्र समुपदेशक" हे प्रमाणपत्र
प्रदान करण्यात येईल. या प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारांना :
●
शाळा
व महाविद्यालयांमध्ये समुपदेशक म्हणून संधी
●
अमृत
मानसमित्र उपक्रमाशी संलग्न होण्याची संधी
●
मानसिक
आरोग्य व जीवनकौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी
●
स्वयंरोजगार
व व्यावसायिक प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
अर्ज कसा करावा ? :- अमृत
या संस्थेच्या वेबसाईटवर (https://mahaamrut.org.in/
) अमृत मानस मित्र या योजनेअंतर्गत इच्छुकांना अर्ज करता येईल. यासाठी आवश्यक असलेले
कागदपत्राचे पुरावे अपलोड करावे लागतील. अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांना
‘प्रथम येईल त्याच प्राधान्य’ या तत्त्वावर या प्रशिक्षणासाठी प्रवेश दिल्या जाईल.
पहिल्या बॅच साठी अर्जाची मुदत :- अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पहिल्या बॅचसाठी
ऑनलाईन अर्ज 15 जून ते 22 जून 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईनवर अर्ज करता येईल. छाननीअंती
पात्र झालेल्या उमेदवारांना ई-मेल/मेसेजद्वारे कळविण्यात येईल. मुदतीत प्रवेश न घेतल्यास
प्रतीक्षा यादीतील अन्य उमेदवारांना संधी दिल्या जाईल.
इतर माहितीसाठी संपर्क : या
योजनेच्या इतर तपशिलासाठी अमृत या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेच्या जिल्हा व्यवस्थापक
कार्यालयाला भेट देऊन, अमृत जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधून आवश्यक ती माहिती
घेता येईल.
0000000000
Comments
Post a Comment