डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृहात सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेशप्रक्रिया सुरु
ठाणे,दि.12(जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतीगृह, कल्याण,
भिवंडी, उल्हासनगर, शहापूर येथे मुलांचे 4 व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे
शासकीय वसतीगृह, कल्याण, भिवंडी, ठाणे, उल्हासनगर, येथे मुलींची-4 अशी एकूण 8 शासकीय
वसतिगृहे कार्यरत आहेत.
सन २०२६-२७ या
शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर
ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ठाणे जिल्ह्यातील मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहातील
शालेय, कनिष्ठ/वरीष्ठ महाविद्यालय तसेच व्यावसयिक/बिगर व्यावसयिक अभ्यासक्रम जसे की,
बी.ए./बी. कॉम./बी.एस.सी. पदवीका/पदवी आणि पदवीनंतरचे पदव्युत्तर पदवी, पदवीका, नर्सिंग
इत्यादी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी https://hmas.mahait.org प्रस्तुत लिंकचा वापर करून अर्ज भरावे.
वसतीगृहात पुरवण्यात येणाऱ्या सुविधा - मोफत निवास, मोफत भोजन, ग्रंथालय
व अभ्यासिका, संगणक कक्ष व इंटरनेट सुविधा, सुरक्षित इमारत आणि निसर्गरम्य परिसर, सुरक्षा
कर्मचारी व निगराणी व्यवस्था, शासकीय नियमानुसार सुविधा, मासिक निर्वाह भत्ता रुपये
1000/- प्रमाणे, गणवेश व स्टेशनरी सहित्य सुविधा.
आवश्यक कागदपत्रे - जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला, आधार
कार्ड, गुणपत्रिका, पासपोर्ट साईज फोटो, शाळा/ महाविद्यालय प्रवेश बोनाफाईड.
शासकीय वसतीगृहातमध्ये इयत्ता 8 वी ते 10 वी ते पदव्युत्तर
पदवी, पदवीका, नर्सिंग अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,
विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागासप्रवर्ग, दिव्यांग
व अनाथ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.
तरच स्वाधार योजनेचा लाभ - विद्यार्थी शासकीय वसतीगृहात
प्रवेशास पात्र असूनही, जागा नसल्यामुळे त्याला प्रवेश मिळाला नसल्यास स्वाधार योजनेचा
लाभ मिळतो. परंतु संबंधीत विद्यार्थ्याने वसतीगृहासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
सन २०२६-२७ या
शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेशासाठी इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन
अर्ज दाखल करावेत, अधिक माहितीसाठी संबंधीत गृहपाल यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन
समाज कल्याण ठाणे सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी केले आहे.
000000000
Comments
Post a Comment