महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, ठाणे राबवीत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 




ठाणे,दि.10(जिमाका) :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, ठाणे मार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता पात्र लाभार्थ्यांकडून महामंडळ राबवीत असलेल्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

मागासवर्गीय समाज घटकांच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी राज्य शासनामार्फत विविध योजनांचा लाभ राबविण्यात येतात या योजनांद्वारे लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, आर्थिक सक्षमीकरण घडविणे आणि जीवनमान उंचावणे हा प्रमुख उद्देश या महामंडळाचा आहे.

सदर अर्ज प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून, इच्छुक लाभार्थ्यांनी या महामंडळाच्या https://mpbcdc.maharashtra.gov.in किंवा https://mahadisha.in  या संकेतस्थळाच्या पोर्टल द्वारे आपले कर्ज मागणी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सदरचे अर्ज सादरीकरण करताना लाभार्थ्यांनी आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत कोणतेही अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात स्वीकारली जाणार नाहीत.

महामंडळामार्फत उपलब्ध योजनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

१. ५०% अनुदान योजना - एकूण प्रकल्प खर्च : रु.५०,०००/-, महामंडळाचे अनुदान: रु.२५,०००/-, बँक कर्ज : रु.२५,०००/-. या योजनेद्वारे लहान व्यवसाय, सूक्ष्म उद्योग व उपजीविकेस पूरक अशा उपक्रमांना चालना दिली जाते.

2. बीज भांडवल योजना :- प्रकल्प खर्च - रु.५०,००१/- ते रु.५,००,०००/-, महामंडळ सहभाग : २०% जास्तीत जास्त) रु.५०,०००/- अनुदान, बँक सहभाग : ७५% (बँकेच्या विद्यमान व्याजदराने कर्ज), लाभार्थी सहभाग : %, कर्ज परतफेडीचा कालावधी : वर्ष. या योजनेद्वारे उद्योजकता विकसित करण्यासाठी उपयुक्त असून, लाभार्थ्यांना स्थिर व टिकाऊ व्यवसाय उभारता येतो.

3. थेट कर्ज योजना : महामंडळामार्फत थेट लाभार्थ्यांना रु.१,००,०००/- पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते, ही योजना जलद व सुलभ पद्धतीने अंमलात आणली जाते. ज्यामुळे अल्पावधीतच लाभार्थ्यांना व्यवसाय सुरू करता येतो.

वरील सर्व योजनांची सविस्तर माहिती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची यादी व पात्रतेच्या अटी महामंडळाच्या महादिशा पोर्टल वर उपलब्ध आहेत. तरी सर्व इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी माहिती नीट वाचून समजून घेणे अत्यावश्यक आहे.

तरी जास्तीत जास्त इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. जिल्हा व्यवस्थापक ठाणे आर.पी. पेडणेकर यांनी केले आहे.

0000000000

 


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न