धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या नावामध्ये आणि नियमावलीमध्ये सुधारणा
ठाणे,दि.10(जिमाका) :- महाराट्र शासन गृह विभाग शासन निर्णय दि. 24
जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये कल्याणकारी मंडळाची
कार्यपध्दती/कामकाजाबाबतची नियमावली प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच दि. 20 ऑगस्ट
2024 रोजीच्या शासन निर्णयांन्वये सदर मंडळाचे नाव धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र
ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ असे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन शुध्दीपत्रक क्रमांक
एमव्हीआर-0719/प्र.क्र.170/परि-2, दि.20 मे 2026 अन्वये धर्मवीर आनंद दिघे साहेब
महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचे सभासद
होण्याबाबतच्या पात्रतेमध्ये सुधारणा करुन सर्व प्रकारची प्रवासी वाहने चालविणारे
बॅज असलेले अनुज्ञाप्तीधारक यांना मडळाचे सभासद करुन घेण्यास शासन मान्यता देण्यात
आली आहे. तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी
चालक कल्याणकारी मंडळाचे नाव धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतुक
चालक कल्याणकारी मंडळ असे करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे, असे ठाणे विभाग
ठाणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे रोहित काटकर यांनी कळविले आहे.
000000000
Comments
Post a Comment