कु.आदिती हरिशंकर यादव व कु.आकृती हरिशंकर यादव यांचे पालक हरिशंकर यादव यांचा शोध
ठाणे,दि.10(जिमाका) :- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, ठाणे यांच्या मान्यताप्राप्त परिवर्तन महिला
संस्थेत कु. आदिती हरिशंकर यादव (वय 13 वर्षे)व कु. आकृति हरिशंकर यादव (वय 12 वर्षे)या
दोघी बहिणी असून मागील 2 वर्षांपासून परिवर्तन महिला संस्था संचालित मुक्ता प्रकल्प,
मुलींचे बालगृह, टिटवाळा (पूर्व) येथे दि. 24 एप्रिल 2024 रोजी पासून प्रवेशित आहे.
आदिती आणि आकृती यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या आईचे निधन झाले आहे. वडील मद्य
पीत असल्यामुळे आपल्या दोन्ही मुलींची योग्य रितीने काळजी घेऊ शकत नाही. त्यामुळे काळजी
व संरक्षणाकरिता या बालिकांना बालगृहात ठेवण्यात आले आहे. या बालिका संस्थेत दाखल झाल्यापासून
वडिल मुलींना भेटावयास आलेले नाही.
याकरिता
वडिलांचा शोध घेण्याकरिता या बालकांचे पालक कोण? तरी श्री. हरिशंकर यादव आपण जिथे असाल
तेथून आपल्या कु.आदिती हरिशंकर यादव (वय 13 वर्षे) व कु.आकृति हरिशंकर यादव (वय 12
वर्षे) या दोन्ही मुलींना भेटण्यासाठी यावे, असे आवाहन ठाणे जिल्हा महिला व बाल विकास
अधिकारी नमिता शिंदे यांनी केले आहे.
0000000000
Comments
Post a Comment