अमृत संस्थेमार्फत लघु उद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन (EDP)
ठाणे,दि.10(जिमाका) :- अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत
राबविण्यात येत असलेल्या लघुउद्योजक, व्यावसायिक व नवउद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य
विकास कार्यक्रम (Entrepreneurship Development Programme EDP) आयोजित करण्यात आला
आहे. हा कार्यक्रम आभासी आणि प्रत्यक्ष स्वरूपात होणार आहे.
उद्योजकता विकासाला चालना देण्यासाठी आणि नवउद्योजकांना
व्यवसाय क्षेत्रात सक्षम बनविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम खुल्या प्रवर्गातील इच्छुक
युवक-युवती, महिला, स्वयंरोजगार इच्छुक आणि लघुउद्योजकांसाठी आयोजित करण्यात आला आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये व्यवसाय निवड, उद्योग
उभारणी, व्यवसाय व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, विपणन कौशल्य, ग्राहक सेवा, डिजिटल माध्यमांचा
वापर, शासकीय योजना व अनुदानाची माहिती तसेच उद्योजकतेसाठी आवश्यक असलेल्या विविध कौशल्यांचे
मार्गदर्शन तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत करण्यात येणार आहे.
स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा
असलेल्या व्यक्तींना या प्रशिक्षणाचा मोठा लाभ होणार असून, उद्योजकतेच्या क्षेत्रात
यशस्वी वाटचाल करण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्ये विकसित करण्याची ही उत्तम संधी आहे.
कोण घेऊ शकते या योजनेचा लाभ?
खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय
संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा
अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी,
पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी,
बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार
अशा 25 जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा
कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊ शकतात.
तरी अधिकाधिक इच्छुकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा,
असे आवाहन अमृत संस्थेच्या जिल्हा उप व्यवस्थापक माया रत्नपारखी-खेत्रे यांनी केले
आहे. वतीने करण्यात आले आहे.
000000000
Comments
Post a Comment