Posts

मतदार जनजागृतीसाठी धावले ठाणेकर

Image
ठाणे दि.   19( जिमाका) - लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत जनजागृतीचे अनेक उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने आज मतदार जनजागृती दौडचे आयोजन करण्यात आले. यावेळी ठाणेकर धावपटूंनी शेकडोंच्या संख्येने सहभागी होऊन मतदारांमध्ये जनजागृती केली. येथील कोर्ट नाका परिसरात सकाळी सात वाजल्यापासून ही दौड आयोजित करण्यात आली होती. सकाळपासून मोठ्या उत्साहात प्रशासनातले अधिकारी कर्मचारी, तसेच धावपटू मोठ्या उत्साहात उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती अपर्णा सोमाणी, स्वीप उपक्रम नोडल अधिकारी रेवती गायकर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण प्रसाद खैरनार तसेच अन्य अधिकारी कर्मचारी व धावपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला सर्व सहभागी धावपटूंना जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी शुभेच्छा देऊन मतदान जनजागृती करण्याचे आवाहन केले. त्यानंतर रंगित फुगे हवेत सोडण्यात आले व झेंडा दाखवून दौड सुरु करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय, जांभळीनाका, दगडीशाळा, गजानन महाराज चौक, 3 प्रेट्रोल...

मतदानासाठी पगारी सुट्टी

ठाणे दि.   16   ( जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीक री ता ठाणे जिल्ह्यात सोमवार दि.29 एप्रिल रोजी  मतदान होणार आहे. या मतदानात सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 अन्वये अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने व   आस्थापना वगळून सर्व दुकाने , आस्थापना कारखाने येथील कामगार , कर्मचारी व अधिकारी यांना पगारी सुटृी देण्यात येत आहे.  या मतदानासाठीच्या सुट्टीच्या दिवसाचा पगार कपात करण्यात येवू नये.अत्यावश्यक सेवा दुकाने व आस्थापना वगळून सर्व   आस्थापना मतदानाच्या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळात बंद ठेवण्यात याव्यात ,असे आवाहन कामगार उप आयुक्त ठाणे यांनी केले आहे.      अपवादात्मक परिस्थितीत कामगार , अधिकारी , कर्मचारी इत्यादीना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र , त्याबाबत संबंधित आस्थापनांनी महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकाऱ्यांची पुर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल. कोणत्याही परिस्थितीत मतदारां...

मतदान व मतमोजणी केंद्र परिसरात मनाई आदेश

ठाणे दि.   16   ( जिमाका) :    लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून सोमवार दि.   2 9 एप्रिल रोजी मतदान व गुरुवार दि.23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रामध्ये 23 - भिवंडी   , 24 - कल्याण ,   25 - ठाणे असे तीन   लोकसभा क्षेत्रातील सर्व मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रावर शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी   त्या त्या ठिकाणी   व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या चहुबाजूने   100   मीटर परिसरात कलम   144(   1) अन्वये   पोलीस आयुक्त ठाणे शहर विवेक फणसळकर   यांनी   मनाई आदेश   दिले आहेत. या अन्वये या परिसरात कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी ,   कार्यकर्ते   ,   प्रतिनिधी बैठक ,   प त्रकार   परिषद आदी कार्यक्रम घेण्यास प्रति बंध   करण्यात आला आहे. सदर आदेश शनिवार दि.27 एप्रिल मध्यरात्रीपासुन ते गुरुवार दि.23 मे रोजी मध्यरात्री पर्यंत किंवा मतमोजणी प्रक्रिया संपुष्टात येईपर्यंत अंमलात राहिल , असे    पोलीस आ...

पत्रपरिषदः मतदार जनजागृतीसाठी मॅरेथॉन, सायकल रॅलीचे नियोजन

Image
ठाणे दि.   16( जिमाका) - लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने मतदारांना अधिकाधिक संख्येने मतदानासाठी आवाहन करण्यासाठी 28 तारखेपर्यंत विविध उपक्रम स्वीप उपक्रमाअंतर्गत जिल्हाभरात राबविण्यात येणार आहेत,अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा स्वीप उपक्रम नोडल अधिकारी रेवती गायकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ठाणे जिल्ह्यातील मतदारांना आवाहन करण्यासाठी तयार करण्यात आलेला बिबट्याचा लोगो ही पत्रकारांना दाखवण्यात आला. या पत्रकार परिषदेस निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी ही उपस्थित होत्या. यावेळी श्रीमती गायकर म्हणाल्या की, सर्व स्तरातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा जिल्हा निवडणूक यंत्रणेचा प्रयत्न आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी 50 टक्के मतदान झाले होते. त्याची कारण मिमांसा करुन यावेळी स्वीप उपक्रमाची आखणी करण्यात आली. समाजातील महिला, पुरुष, महाविद्यालयीन विद्यार्थि विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग इ. घटकांपर्यंत मतदानाचे महत्त्व आणि मतदान करण्याचे आवाहन पोहोचविण्यात आले आहे. हे करतांना वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करण्यात आला, अशी माहितीही गायकर यांनी दिली. येत...

कळवा मुंब्रा विभागात मतदान जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहीम

ठाणे दि.   1 5 ( जिमाका) -   भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार , लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी 24 कल्याण लोकसभा मतदार संघात कळवा मुंब्रा येथे स्वाक्षरी जगजागृती मोहिम राबवून   मतदान करण्याचा संदेश देण्यात आला.मतदाराच्या भ्रमणध्वनीच्या मागे   ‘ मी मतदान करणारच ”  जनजागृतीचा संदेश देणारा स्टीकर लावण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर , आयुक्त संजिव जयस्वाल   निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील , उप आयुक्त माळवी , ठाणे मनपा अतिरिक्त आयुक्त आहिराव जोशी , बेडेकर कॉलेच्या प्राचार्य श्रीमती.सुचित्रा नाईक ,   उप प्राचार्य अनिल भाबंड सर ,   शिंदे सर   व कार्यालयातील कर्मचारी यांनी मतदान जनजागृती सहभाग घेतला .सदरची मोहिम श्रीमती रेवती गायकर व महेश आहेर , सह आयुक्त मुंब्रा प्रभाग समिती , यांचे मार्गदर्शनानुसार राबविण्यात आली.या कार्यक्रमासाठी स्विप सहाय्यक मुकुंद गणेश सराफ यांनी विशेष प्रयत्न केले.

ठाणे, कल्याण लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक पोलीस निरीक्षक किमे अया दाखल

  ठाणे , दि . 15 ( जिमाका ) : लोकस भा   निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर   25   ठाणे     24 कल्याण   या     मतदार संघाचे निवडणूक आयोगाचे   पोलीस निरीक्षक श्री. किमे अया निरीक्षक(भा.पो .से )   हे मतदार संघात दाखल झाले आहेत .   त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9372574802 असा आहे. ज्या   व्यक्तींना   निवडणूक विषयक तक्रार करावयाची असेल , त्यांच्यासाठी ते शासकीय विश्रामगृह कोर्ट नाका , ठाणे ,   येथे सकाळी   1 0 ते 11 या वेळेत उपलब्ध असतील असे निवडणूक निर्णय अधिकारी ठाणे यांनी कळविले आहे .

स्टिकर्स, सह्यांच्या माध्यमातून मतदानाचे आवाहन; गॅस सिलेंडरद्वारेही संदेश पोहोचणार घराघरात

Image
ठाणे दि.   15 ( जिमाका) - लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी  स्वीप उपक्रम राबविला जात आहे. मतदारांमध्ये मतदानाच्या हक्काप्रति जागृती करणे, यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यातच एक मोबाईलला स्टिकर लावून जनजागृती करणे व मान्यवरांच्या सह्या घेऊन त्यांना आवाहन करणे हा उपक्रम लक्षवेधी ठरला आहे. स्वीप उपक्रमाच्या नोडल अधिकारी रेवती गायकर व त्यांचे सहकारी मुकूंद गणेश सराफ यांच्या संकल्पनेतून  हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक सरकारी कार्यालय, खाजगी आस्थापनांना भेटी देऊन  लोकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या मोबाईल हॅण्डसेटच्या पाठच्या बाजूला ‘29 एप्रिल रोजी कोणालाही करा,मतदान करा.’ हे स्टिकर लावून दिले जाते. त्यामुळे जेव्हा आपण मोबाईल कानाला लावून बोलतो तेव्हा समोरचा व्यक्ती तो संदेश सहज वाचू शकतो. या शिवाय एका डायरीत स्टिकर चिकटवून त्याखाली मान्यवरांच्या स्वाक्षरी नोंदवून त्यांना मतदान करण्याबाबत आवाहन केले जातेय. यात स्वतः जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मनपा आयुक्त संजीव जयस्वाल, 24 कल्याणचे निवडणूक निर्णय अधि...