कल्याण येथील मागासवर्गीय मुलींचे
शासकीय वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश
ठाणे दि.16(
जिमाका):मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, कल्याण येथील इयत्ता आठवी ते बारावी विद्यार्थ्यांना
सन 2021-22 करीता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात
आलेली आहे.
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राहाण्याची सोय
व अंथरुण-पांघरुण, दुध, नाश्ता, दोन वेळचे जेवण, फळ, दरमहा निर्वाहभत्ता रु.500/-,
सुसज्ज ग्रंथालय,संगणक कक्ष इत्यादी सोयी मोफत देण्यात येणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी
शासकीय वसतिगृह,कल्याण,पुष्पकधाम अपार्टमेंट,बी विंग,1 ला माळा,बेतुरकरपाडा,कल्याण
(प) येथे संपर्क करावा असे आवाहन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचे व्यवस्थापक
यांनी केले आहे.
Comments
Post a Comment