भिवंडी येथील मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु

 


 ठाणे दि.16 (जिमाका):मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह भिवंडी येथील सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी वसतीगृहामध्ये दि.16 नोव्हेंबर 2021 पासून ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.असे वसतीगृहांचे व्यवस्थापक श्रीमती आर. एन. गोन्नाडे यांनी कळविले आहे.

            इयत्ता आठवी ते बारावी व महाविद्यालयीन विभाग, पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेले (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून )ऑफलाईन अर्ज भरु शकतील . या योजनेसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, विशेष मागास प्रवर्ग,आर्थिकदृष्टया मागासवप्रवर्ग, अपंग, अनाथ, दारिद्र रेषेखालील विद्यार्थी ऑफलाईन अर्ज करण्यास पात्र आहेत.

 पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा अनु. जातीसाठी रु.२.०० लाख, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी रु. १.०० लाख अपंग व अनाथ यांचयसाठी उत्पन्नाची मर्यादा नाही.अर्जात भरलेली माहिती चुकीची असल्यास आवश्यक कागदपत्रे नसल्यास प्रवेश रद करण्याचे अधिकार वसतीगृहाचे गृहप्रमुख / गृहपाल यांना राहतील. याबाबत कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.

 प्रवेशाचे अर्ज घेण्यासाठी शासकीय सुट्टी वगळून वसतीगृहात कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावे.असे आवाहन मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहांचे व्यवस्थापक श्रीमती आर. एन. गोन्नाडे यांनी केले आहे.

000000000

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट