10 वी व 12 वी परीक्षेच्या एक दिवस अगोदर पर्यंत परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार

 

ठाणे, दि.31 (जिमाका): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 मध्ये  होणाऱ्या  इयत्ता 12 वी ची परीक्षा 04 मार्च 2022 ला तर  दहावीची परीक्षा दि. 15 मार्च 2022 ला सुरु होत असून  नियमित शुल्क भरुन परीक्षेच्या एक दिवस अगोदर पर्यंत ऑनलाईन  पध्दतीने आवेदनपत्र सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.ही सुविधा फक्त मार्च-एप्रिल 2022 या वर्षा पुरतीच आहे.या बदलाची सर्व मुख्याध्यापक/प्राचार्य, सर्व माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी नोंद घ्यावी,असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे  प्र.सचिव अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

0000000

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न