सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील केरोसीनच्या किरकोळ विक्री दरात सुधारणा
ठाणे दि. 03 (जिमाका) :- जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (रेशनिंग) केरोसीनच्या घाऊक व किरकोळ विक्री दरात सुधारणा करण्यात आली असून, या महिन्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यांकरिता सुधारीत किरकोळ विक्री दराबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी राजू थोटे यांनी अधिसूचना आज जारी केली आहे.
या अधिसूचनेनुसार ठाणे तालुक्यासाठी केरोसीनचा प्रति लिटर किरकोळ विक्री दर
49.63 रुपये असून उल्हासनगर
तालुक्याकरीता 49.88 रुपये, कल्याण 49.80
रुपये, अंबरनाथ 49.88 रुपये, भिवंडी 49.72 रुपये, मुरबाड 50.08 रुपये आणि शहापूर 50.05 रुपये असा दर निश्चित
करण्यात आला आहे.
000000
Comments
Post a Comment