जागतिक एड्स प्रतिबंध दिनानिमित्त उकृष्ट काम करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
ठाणे दि.1
(जिमाका) जागतिक एड्स प्रतिबंध दिनानिमित्त उकृष्ट काम
करणाऱ्या आरोग्य केंद्र व स्वयंसेवी संस्था यांचा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास
पवार यांच्या हस्ते आज गौरव करण्यात आला.
जिल्हा
सामान्य रुग्णालयात झालेल्या या कार्यक्रमास ऑथोपेडिक सर्जन डॉ.भंडारी,
जिल्हा एडस प्रतिबंध अधिकारी रतन गाढवे, अशोक
देशमुख,डॉ.गिरीजा ठाकूर,श्रीम.ज्योती
रासकर व कर्मचारी उपस्थित होत.
यावेळी
श्री.पवार म्हणाले की,नवीन एच.आय.व्ही.संसर्ग रोखणे, कलंक आणि भेदभावाच्या घटना रोखणे,
एच.आय.व्ही. ने होणाऱ्या मृत्युचे प्रमाण शून्यावर आणणे. या दृष्टीकोनातून वाटचाल सुरु
आहे. जिल्ह्यात एच.आय.व्ही. संसर्गितांची आकडेवारी कमी होत असल्याचे दिसत असून सन 2030 पर्यंत एड्स मुक्त भारत करण्याचे उद्दिष्टे आहे.यासाठी
शासनाद्वारे सामाजिक संस्थांच्या मार्फत अनेक योजना राबविल्या जात असून जनजागृती करण्यात
येत आहे.
ठाणे
सामान्य रुग्णालय यांच्या अंतर्गत कार्यरत आय.सी.टी.सी.,ए.आर.टी, रक्तपेढी, डि,एस
आर सी प्राथमिक आरोग्य केंद्र, महानगरपालिके मधील आर.सी. एच व आर एन.टी. सी.पी
मधील सेंटर मिनाताई ठाकरे रुग्णालय,नेरुळ नवी मुंबई, मध्यवर्ती रुग्णालय,
उल्हासनगर,इंदिरा गांधी रुग्णालय,भिवंडी,राजमाता जिजाऊमाता
रुग्णालय,ऐरोली,भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय,मिरारोड,ए.आर.टी सेंटर,इंदिरा
गांधी रुग्णालय भिवंडी,ए.आर.टी सेंटर छत्रपती रुग्णालय,कळवा,ए.आर.टी सेंटर जनरल
रुग्णालय वाशी,एस.टी.आय सेंटर,सामान्य रुग्णालय ठाणे, एस.टी.आय सेंटर,इंदिरा गांधी
रुग्णालय,मिरारोड, एस.टी.आय सेंटर,मध्यवर्ती रुग्णालय,उल्हासनगर,ब्लड लाईन ब्लड
बॅक,ठाणे,जनरल रुग्णालय ब्लॅड बॅक वाशी,प्राथमिक आरोग्य केंद्र निलजे ता.कल्याण,
प्राथमिक आरोग्य केंद्र पडघा ता.भिवंडी, प्राथमिक आरोग्य केंद्र खडवली
ता.कल्याण,माथाडी रुग्णालय,कोपरखैराणे, साई सिध्दी लॅब,तुर्भे,सुविधा
लॅब,उल्हासनगर, सेफ इंडिया भाईंदर,आदिती असर ठाणे,महिला विकास आणि शिसु संस्कार
केंद्र नवी मुंबई,सि.डी.आय युनिट, मिरारोड,ए.आर सी ठाणे, एफ आर सी ठाणे, एफ.पी.ए
आय युनिट भिवंडी,किन्नरअस्मीता युनिट शहाड, किन्नर अस्मीता युनिट भिवंडी,सखी चार चौघी विरार,सेफ इंडिया भिवंडी
या संस्थाना गौरव करण्यात आला.
00000000
Comments
Post a Comment