जिल्हा युवा पुरस्कारासाठी १५ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

ठाणे, दि. ३ (जिमाका): युवक कल्याण क्षेत्रात विकासाचे कार्य करणाऱ्या युवांसाठी तसेच संस्थासाठी जिल्हास्तरावर युवा पुरस्कार देण्यात येतो. युवा व संस्थांची दि.१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीसह गेल्या तीन वर्षातील सर्वोत्कृष्ट कामगिरी विचारात घेतली जाईल. संबधितांनी या पुरस्कारांसाठी परिपूर्ण प्रस्ताव दि. १५ डिसेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल सांळुखे यांनी केले आहे.

            पुरस्कारासाठी निकष असे: एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांना जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी युवक व युवतीचे वय ३५ वर्ष, ठाणे जिल्हयात सलग पाच वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. केलेल्या कामाचे पुरावे सादर करणे आवश्यक आहेत.  पुरस्कार दिल्या नंतर दोन वर्षे कार्यरत राहणे, संस्था नोंदणीकृत तसेच किमान पाच वर्षे कार्यरत असणे आवश्यक असून संस्थेचे कार्य स्वयंस्फुर्तीने केलेले असावे. पुरस्काराचे प्रस्ताव जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी परिसर, कोर्ट नाका जवळ, ठाणे येथे दाखल करावेत.

            प्रस्ताव तयार करण्यासाठी मार्गदर्शन हवे असल्यास राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते अजित कारभारी (मो. नं.- ९५९४४२८४७७) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट