उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती बैठकीचे आयोजन
ठाणे,दि.27(जिमाका):- उपमुख्यमंत्री, नगर विकास, गृहनिर्माण व सार्वजनिक बांधकाम (सा.उ.) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथे बुधवार, दि.29 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 04.00 वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
तरी, जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment