उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात ३५ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ ही क्रीडा स्पर्धा महाराष्ट्राची "महा ऑलिम्पिक" महाराष्ट्र पोलीस दलाची शारीरिक क्षमता आणि स्पर्धात्मक भावना दाखविण्याची संधी - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि.27(जिमाका) : पोलीस विश्वात होणारी ही क्रीडा स्पर्धा महाराष्ट्राची "महा ऑलिम्पिक" असून महाराष्ट्र पोलीस दलाची शारीरिक क्षमता आणि स्पर्धात्मक भावना दाखविण्याची ही एक संधी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. येथील साकेत मैदानावर 35 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 चा दिमाखदार शुभारंभ उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.12 वर्षांनंतर ठाणे पोलीस आयुक्तालयाने आयोजित केलेला हा कार्यक्रम राज्याच्या क्रीडा दिनदर्शिकेतील एक महत्त्वाचा क्षण आहे. या दिमाखदार सोहळ्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, गृहराज्यमंत्री योगेश कदम, महाराष्ट्र पोलीस महासंचालक (डीजीपी) रश्मी शुक्ला, तसेच राज्यभरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका (टीएमसी) आयुक्त सौरभ राव, आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांचीही विशेष उपस्थिती होती. उपमुख्...