निरीक्षक वैधमापनशास्त्र, ठाणे-1, ठाणे-2, ठाणे-3 व भाईंदर विभाग ही कार्यालये वागळे इस्टेट येथे नवीन जागेत स्थलांतरीत

 



 

ठाणे,दि.21(जिमाका) :- उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र, ठाणे जिल्हा क्र.1, ठाणे या कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत असलेले निरीक्षक वैध मापनशास्त्र, ठाणे-1, ठाणे-2, ठाणे-3 व भाईंदर विभाग ही कार्यालये खाजगी जागेत भाडेतत्वावर तृणपुष्प सोसायटी, पाईप लाईन रोड, लुईसवाडी, ठाणे (प) 400604 या जागेत कार्यरत होते.

हे कार्यालय दि.18 फेब्रुवारी 2025 पासून नवीन जागेत स्थालांतरित करण्यात आले असून या कार्यालयांचा नवीन पत्ता निरीक्षक वैध मापनशास्त्र ठाणे-1, ठाणे-2, ठाणे-3 व भाईंदर विभाग ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवा, येथील प्रशासकीय भवन पहिला मजला, रोड नं. 27 आणि 34, वागळे आगार, वागळे इस्टेट, ठाणे (प) -400604  असा असल्याचे ठाणे जिल्हा क्र.1, ठाणे वैधमापन शास्त्र उपनियंत्रक रा.फ.राठोड यांनी कळविले आहे.

00000

 


Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ