ठाणे महसूल विभागातील नवनियुक्त कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण संपन्न
ठाणे,दि.27(जिमाका):- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नवनियुक्त कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा नियोजन भवन समिती सभागृहामध्ये आज पायाभूत प्रशिक्षण पार पडले.
यावेळी प्र.अपर जिल्हाधिकारी विकास गजरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, तहसिलदार रेवण लेंभे, सचिन चौधर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांमधील कर्मचारी उपस्थित होते.
या प्रशिक्षणाद्वारे सहाय्यक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, महसूल सहायक आणि ग्राम महसूल अधिकारी या पदांवरील कर्मचाऱ्यांसह कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांना रजा नियम, शिस्त व अपील, टिपणी व पत्रलेखन, सहा गठ्ठा पद्धती, ई-ऑफिस, IGOT, आर्थिक व्यवस्थापन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी सहा गठ्ठा पद्धती, उपअधिदान व लेखा अधिकारी भानुदास जठार, लेखाधिकारी अश्विनी सुर्वे व अश्लेषा जाधव यांनी रजा नियम, शिस्त व अपील, टिपणी व पत्रलेखन या विषयीचे मार्गदर्शन केले. तसेच ई-ऑफिस प्रणालीचे जिल्हा समन्वयक कृष्णा उथळे, विभागीय आयुक्त कार्यालयातील ई-ऑफिस प्रणालीच्या समन्वयक स्वाती सानप यांनी ई-ऑफिस प्रणालीबाबत मार्गदर्शन केले. सी-डॅक प्रगत संगणन विकास केंद्राचे सहसंचालक प्रकाश पिंपळे यांनी IGOT, कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयावर तर आर्थिक व्यवस्थापनाविषयी एलएमएन फायनॅन्शियल सर्व्हिसेसचे संचालक लॉईड रेगो यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शेवटच्या सत्रात जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी जनसंपर्क, जिल्हा माहिती कार्यालयाचे कामकाज आणि दैनंदिन कामकाजातील आनंद व सकारात्मकता, कर्मचाऱ्यांचा आपापसातील समन्वय याबाबत प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणात सहाय्यक महसूल अधिकारी - 52 कर्मचारी, मंडळ अधिकारी – 5 कर्मचारी, महसूल सहायक - 51 कर्मचारी, ग्राम महसूल अधिकारी (नवनियुक्त) - 69 कर्मचारी असे मिळून 177 कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
00000


Comments
Post a Comment