माजी सैनिक / विधवा व त्यांच्या पाल्यांनी विशेष गौरव पुरस्कार मिळण्यासाठी दि.15 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत


ठाणे,दि.23(जिमाका):- ठाणे/पालघर सैनिक कल्याण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या माजी सैनिक/माजी सैनिक विधवा, ज्यांचे पाल्य शैक्षणिक वर्ष 2024-2025 मध्ये शालांत (इ.10 वी) परिक्षेमध्ये 90% व उच्च माध्यमिक (इ.12 वी) परिक्षेमध्ये 85% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होवून शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये पुढील शिक्षण घेत आहेत व ज्यांचे पाल्य पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत किंवा ज्या माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांना IIT, IIM, AIIMS अशा नामवंत व ख्याती प्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळाला आहे, तसेच राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, नृत्य इ. क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोडा, अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे तसेच देश/राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक/पत्नी/पाल्य इत्यादींना विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

अर्ज मिळण्याकरिता माजी ‍सैनिकांनी स्वत:च्या ईमेलवरुन या कार्यालयाच्या zswo_thane@maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क करावा.

तरी पात्रताधारक लाभार्थींनी गौरव पुरस्कार मिळण्याबाबतचे अर्ज दि.15 सप्टेंबर 2025 पर्यंत कार्यालयात सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयीन दूरध्वनी क्र.०२२-२५३४३१७४ /९९२००१६५८० वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे/पालघर मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त) यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे 21 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक समावेशन सॅच्युरेशन शिबिराचे आयोजन