सर्व खत विक्रेत्यांनी अनुदानित रासायनिक खतांची विक्री ही ई-पॉस (e-PoS) प्रणालीच्या माध्यमातून करणे बंधनकारक


ठाणे,दि.29(जिमाका):- सर्व किरकोळ रासायनिक खत विक्रेत्यांना सूचित करण्यात येते की, अनुदानित रासायनिक खतांची विक्री ही ई-पॉस (e-PoS) प्रणालीच्या माध्यमातून करणे बंधनकारक आहे. खत विक्रीच्या नोंदी या तात्काळ आणि अचूक पद्धतीने प्रणालीमध्ये समाविष्ट होणे आवश्यक आहे. यासाठी खालील बाबतीत कार्यवाही करण्यात यावी.

·        ई-पॉस (e-PoS) स्टॉक व प्रत्यक्ष साठा समान असणे.

विक्रेत्यांच्या e-PoS प्रणालीवरील खत साठा व प्रत्यक्ष गोडाऊनमधील साठा यामध्ये कोणतीही तफावत असू नये. यासाठी रासायनिक खतांच्या विक्रीची नोंद iFMS प्रणालीमध्ये तत्क्षणी (Real Time) घेणे बंधनकारक आहे. याबाबात नियमित तपासणी करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील खत निरीक्षकांना निर्देश देण्यात आले आहेत. ज्या विक्रेत्यांकडे e-PoS वरील खत साठा व प्रत्यक्ष साठा यामध्ये फरक आढळेल, अशा विक्रेत्यांच्या परवान्यांवर नियामोचीत कारवाई करण्याच्या सूचना परवाना अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

·        नवीन L1 security e-PoS मशीनबाबत.

ज्या विक्रेत्यांनी अद्याप नवीन L1 security e-PoS मशीन प्राप्त केलेले नाहीत, त्यांनी संबंधित जिल्ह्यातील कृषी विकास अधिकारी, जि.प. यांच्या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधून दि.10 ऑगस्ट 2025 पूर्वी e-PoS मशीन प्राप्त करून कार्यान्वित करून घ्यावे, असे महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे 21 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक समावेशन सॅच्युरेशन शिबिराचे आयोजन