शासनमान्य ग्रंथांच्या यादीकरिता सन 2024 या कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ पाठविण्याबाबत आवाहन

ठाणे,दि.30(जिमाका) : राज्यातील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना राज्यात मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या ग्रंथांची माहिती वा खरेदीकरिता मार्गदर्शक ठरावी म्हणून ग्रंथालय संचालनालयाकडून ग्रंथ निवड समितीच्या सदस्यांनी शिफारस केलेली वर्षनिहाय शासनमान्य ग्रंथांची यादी प्रकाशित करण्यात येते.

या शासनमान्य ग्रंथांची यादी करिता सन 2024 या कॅलेंडर (1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024) वर्षात प्रकाशित झालेल्या मराठी भाषेतील ग्रंथांची निवड करण्यासाठी आणि शासनमान्य ग्रंथांच्या यादीत समावेश होण्याच्या दृष्टीने सन 2024 या कॅलेंडर वर्षामध्ये प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांची प्रत्येकी एक प्रत विनामूल्य (Complimentary copy) ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, टाऊन हॉल, मुंबई-400 001 यांच्याकडे दि.15 ऑक्टोबर, 2025 पर्यंत पाठविण्यात यावीत. 

सन 2024 या वर्षात प्रकाशित झालेले ग्रंथ जर यापूर्वी संचालनालयास पाठविले असल्यास पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही.

हे निवेदन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in व ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर ठेवण्यात आले आहे, असे ग्रंथाल संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई प्र. ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे 21 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक समावेशन सॅच्युरेशन शिबिराचे आयोजन