ग्रंथालय संचालनालयाच्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेंतर्गत 50 व्या ग्रंथभेट योजनेसाठी निवड झालेल्या ग्रंथांची यादी संकेतस्थळावर जाहीर


ठाणे,दि.30(जिमाका) : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून 50 व्या ग्रंथभेट योजनेंतर्गत सन 2023 मध्ये प्रकाशित व संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमिती सदस्यांनी निवड केलेल्या 1388 ग्रंथांची यादी (मराठी - 749, हिंदी - 297, व इंग्रजी - 342) ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि.26 सप्टेंबर, 2025 ते दि. 15 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत अवलोकनार्थ खुली ठेवण्यात आलेली आहे. या ग्रंथ यादीतील ग्रंथ किमान 25 टक्के सूट दराने वितरीत करणे बंधनकारक आहे.

या ग्रंथयादीतील कोणत्याही ग्रंथाबाबतची सूचना/ हरकती/ आक्षेप असल्यास दि.15ऑक्टोबर, 2025 पर्यंत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई – 400 001 यांच्याकडे लेखी स्वरुपात कार्यालयीन वेळेत हस्तबटवड्याने वा पोस्टाने अथवा उपरोक्त नमूद केलेल्या ई-मेल वर पाठवावेत. मुदतीनंतर प्राप्त सूचनांचा/हरकतींचा/आक्षेपांचा विचार केला जाणार नाही.

यादीत ग्रंथांचे नाव, लेखक, प्रकाशक व किंमत यामध्ये काही बदल असल्याचे निदर्शनास आणून दिल्यास स्वागतार्ह असेल, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक तथा अध्यक्ष राज्य ग्रंथालय नियोजन समितीची उपसमिती ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे 21 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक समावेशन सॅच्युरेशन शिबिराचे आयोजन