माजी सैनिक/विधवांचे पाल्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना २०२५-२६

 

          ठाणे,दि.30(जिमाका) :- माजी सैनिक/माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना केंद्रिय सैनिक बोर्डनवी दिल्ली यांच्यामार्फत पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाणार आहेज्यांचे पाल्य शैवर्ष 2024-25 मध्ये .12 वीडिप्लेामा व पदवीपरीक्षेमध्ये किमान 60% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत व त्यांनी Engineering, B.Tech, MBBS, BDS, B.Ed, BBA, B.Pharm, BCA, MBA  MCA इत्यादी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे, अशा पाल्यांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे आहेत. हे अर्ज आणि पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठीच्या अभ्यासक्रमाची यादी केंद्रिय सैनिक बोर्डनवी दिल्ली यांच्या www.ksb.gov.in या संकेस्थळावर उपलब्ध आहे. संबंधित माजी सैनिक/माजी सैनिक विधवांनी त्यांचे ऑनलाईन अर्ज दि.31 डिसेंबर 2025 पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे सादर करावेतअर्ज भरण्यापूर्वी लाभार्थ्यांनी संकेस्थळावर देण्यात आलेल्या Annexure-1,2,3 च्या प्रती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीकॉलेजचे Vice Chancellor/Principal/Vice Principal/Dean/Associate Dean/Registrar/Dy Registrar व बँक मॅनेजर यांची स्वाक्षरी घेवून सोबत ठेवावेतसर्व लाभार्थ्यानी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत व त्यासोबत जेाडलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रति घेवून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कागदपत्रांच्या पडताळणीकरीता उपस्थित राहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीठाणे/पालघर मेजर प्रांजळ जाधव यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी ०२०-४५६४१५९३ / ९९२००१६५८० या क्रमांकावर संपर्क साधावा.

00000

Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न