माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


ठाणे,दि.31(जिमाका): भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना राष्ट्रीय संकल्प दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस ही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

            यावेळी ठाण्याचे कामगार उपायुक्त संभाजी व्हनाळकर, सहायक कामगार आयुक्त चेतन जगताप, सहायक कामगार आयुक्त सारिका राऊत, कल्याणच्या सहायक कामगार आयुक्त अनघा क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे 21 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक समावेशन सॅच्युरेशन शिबिराचे आयोजन