जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक पदे भरण्यासाठी 26 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
ठाणे,दि.10(जिमाका):- सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा
सैनिक कल्याण कार्यालयातील सरळसेवेने लिपिक टंकलेखक गट ‘क’ ही पदे भरण्याकरिता उमेदवारांकडून
ऑनलाईन पध्दतीने दि.05 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते.
तथापि, जास्तीत जास्त उमेदवारांना अर्ज भरण्याची
संधी मिळण्याकरिता अर्ज भरण्याची मुदतवाढ दि.26 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत
देण्यात येत आहे, असे सैनिक कल्याण विभाग संचालक कर्नल दिपक ठोंगे (निवृत्त) यांनी
कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment